जामखेड न्युज——
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कर्जत व जामखेड तालुक्यातील नऊ आरोपींना हद्दपार करण्याचा आदेश प्रशासनाच्या वतीने काढण्यात आला आहे यामुळे गुन्हेगारी जगताचे धाबे दणाणले आहेत.

कर्जत उपविभागांतर्गत कायदा व सुव्यवस्था राखणेकामी पोलीस निरीक्षक, कर्जत व पोलीस निरीक्षक
जामखेड यांचेमार्फत मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६(१)(अ) (ब) अन्वये हद्दपार करणेकामी प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यानुसार कर्जत तालुक्यातील ०२ व जामखेड तालुक्यातील ०७ आरोपीस हद्दपार करण्यात आले आहे.

कर्जत तालुक्यातील विलास अबलुक्या काळे, रा.कर्जत व पद्मराज अर्जुन ढोणे, रा. मिरजगाव यांना
अहमदनगर जिल्हा, बीड जिल्हयातील आष्टी तालुका, पुणे जिल्हयातील दौंड तालुका, सोलापूर जिल्हयातील करमाळा
तालुक्यातुन ६ महिन्यांकरीता हद्दपार करण्यात आले आहे. तसेच जामखेड तालुक्यातील महादेव रावसाहेब जायभाय, रा.जायभायवाडी यांना १ वर्षांकरीता, पप्पु उर्फ ऋषिकेश मोहन जाधव, रा. जामखेड, शरद गुलबशा भोसले, रा.खांडवी, हनिफ आयुब कुरेशी, रा.खर्डा, दिपक अशोक चव्हाण रा.जामखेड, शरद उर्फ बंडु युवराज मुळे रा.सारोळा यांना ६ महिन्यांकरीता व अविनाश भुजंग निकम रा.शिऊर यांना ३ महिन्यांकरीता अहमदनगर, बीड व उस्मानाबाद जिल्हयातुन हद्दपार करण्यात आले आहे.
सदर प्रस्तावांवर उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांनी चौकशी करुन अहवाल
उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांचेकडे पाठविले होते. त्यानुसार सदर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.