शिवसेनेचे १५ खासदार नाराज!!! काय म्हणतायेत खासदार सदाशिव लोखंडे

0
312
जामखेड न्युज——
एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड करत राज्यातील सत्तांतर घडवले. महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर आता राज्यात भाजप आणि शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे गट असे सरकार आहे. आमदारांनंतर शिवसेनेतील खासदारही फुटणार अशा चर्चा रंगल्या आहेत. शिवसेनेचे तब्बल 15 खासदार शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या खासदारांमध्ये शिर्डीचे शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. याबाबत सेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्याशी जामखेड न्युजने संपर्क साधला. यावेळी लोखंडे यांनी प्रत्येक प्रश्नाला थेट उत्तर देण्याचं टाळलं. पण त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली. लोखंडे म्हणाले की, 15 खासदारांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत झालेल्या मागच्या बैठकीत भाजपसोबत जाण्याची भूमिका मांडली. यावेळी सर्व खासदारांचा सूर असाच होता, ज्यांच्याविरोधात आपण लढलो, ते परिपूर्ण होत आहेत. आपण मात्र कमकुवत झालोय, अशी खंत खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे बोलून दाखवल्याचं लोखंडे यांनी सांगितले.  
शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांनी आज शिर्डीत निळवंडे पाटपाणी संघर्ष समितीच्या वतीने आयोजित बैठकीला हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे अनेक खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा सूरु असल्यानं अनेकांच लक्ष या बैठकीकडे लागले होते. मात्र राज्यात सत्तांतर झाले असले तरी निळवंडे पाटाच्या कामाला अडचणी येणार नसून हे काम जलदगतीने पूर्ण होईल, असा विश्वास खासदार लोखंडे यांनी यावेळी बोलून दाखवला. 
शिवसेनेचे 15 खासदार नाराज?
 राज्यातील आमदार फूट प्रकरण हा राज्याचा विषय आहे. तो उद्धव ठाकरे आणि आमदारांचा प्रश्न आहे. या संदर्भात मी काय बोलणार? भाजप-शिवसेना म्हणून निवडून आलो ही सर्व खासदारांची भूमिका आधीपासूनच आहे. मागील बैठकीत आपण भाजपसोबत जावं ही 15 खासदारांनी भूमिका मांडली आहे. या संदर्भात सोमवारी उद्धव ठाकरे यांच्या बरोबर बैठकीचे आयोजन केले आहे. त्या बैठकीत आम्ही आमची भूमीका मांडू, असे खासदार लोखंडे म्हणाले. 
एकनाथ शिंदेंशी संपर्क असणारच –
एकनाथ शिंदे शिवसेनेचे मंत्री असताना त्यांनी अनेक कामात मला मदत केली आहे. त्यामुळे आमचा संपर्क त्यांच्याशी असणारच आहे. ज्यांना पाडून आलो ते परिपूर्ण झाले आणि आम्ही कमजोर झालो, अशी खंतही यावेळी लोखंडे यांनी बोलून दाखवली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here