जामखेड न्युज——
सालाबाद प्रमाणे, साधुसंतांच्या अशिर्वादाने व आ. रोहित पवार यांच्या विशेष सहकार्यातून तसेच प्रा.मधुकर (आबा) राळेभात यांच्या मार्गदर्शनखाली याही वर्षी जामखेड ते धाकटी पंढरी ( धनेगांव ) १६ व्या पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

याप्रसंगी मोरे वस्ती येथील श्रीकृष्ण मंदिरात महाआरती करून जामखेड ते धाकटी पंढरी (धनेगांव) पायी दिंडीचे धनेगावकडे प्रस्थान झाले, भरपावसात भक्तीमय वातावरणात हरिनामाचा गजर करीत निघालेल्या दिंडीचे शहराच्या चौकाचौकात स्वागत करण्यात येत होते.

हभप गाडे महाराज व हभप ठाकरे महाराज यांच्या उपस्थितीत प्रारंभ झालेल्या या दिंडीत जेष्ठ पांडुरंग भक्त व नेते प्रा. मधुकर राळेभात,माजी सभापती सुर्यकांत मोरे, प्रा. शहाजी राळेभात, प्रा. आबासाहेब वीर, जेष्ठ नेते वैजीनाथ पोले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजू गोरे, माजी नगरसेवक मोहन पवार, दिगांबर चव्हाण, पवन राळेभात, अमित जाधव, प्रशांत राळेभात, दादा रिटे, पकरा. पिंटू बोरा, संदीप बोराटे, जगदाळे गुरूजी, मोईज शेख, अरूण चिंचकर, दिलीप परदेशी, गुलाब जांंबळे, सुभाष थोरात, अभिमन्यू पवार, गोलेकर सर, मुकुंद राऊत सह मोठ्या संख्येने स्री व पुरुष सहभागी झाले होते.
या पायी दिंडीचा प्रारंभ आज शनिवार दि. ९ जूलै २०२२ रोजी श्री कृष्ण मंदिर, मोरे वस्ती, जामखेड येथून झाला असून सांगता रविवार दि. १० जूलै २०२२ धाकटी पंढरी येथे होणार आहे, या दिंडी मार्गावरील सर्व गावांना पर्यावरण पुरक झाडांचे बी वाटप कार्यक्रम होणार आहेत.