मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्निक विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न मानाचे वारकरी नवले दांपत्य

0
234
जामखेड न्युज——
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात (Pandharpur) विठ्ठल-रुक्मिणी यांची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते सुरू झाली आहे. पूजा करताना मंदिराचा गाभारा विठुमाउलीच्या जयघोषात दुमदुमत आहे. यंदा मानाचे वारकरी म्हणून नवले दाम्पत्यांना मान मिळाला. त्यांनी आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत विठ्ठलाची महापूजा केली. 
या वर्षी कोरोना रुग्णाचे प्रमाण कमी झाल्याने राज्य सरकारने वारीला परवानगी दिली होती. त्यामुळे यंदा वारकऱ्यांमध्ये उत्साह दुणावला. यावर्षी विदेशातील वारकरी देखील पंढरीला आले आहेत. आषाढीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा सुरू झाली आहे. त्यांच्यासोबत खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासहित कार्यकर्ते उपस्थित आहेत. यंदा मानाचा वारकरी म्हणून मुरली नवले आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई नवले यांना मान मिळाला.
नवले दाम्पत्य हे बीड जिल्ह्यातील रुई गावचे रहिवासी आहेत. मुरली नवले व त्यांच्या पत्नी जिजाबाई नवले या गेल्या वीस वर्षापासून पायी आषाढी वारी करतात. हे दाम्पत्य संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा सोबत पंढरपूरला पायी आले आहेत. यंदा मंदिर प्रशासनाने आषाढी एकादशीसाठी जय्यत तयारी केली होती. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here