आष्टी तालुक्यातील ३९ भाविक अमरनाथमध्ये अडकले

0
280
जामखेड न्युज——
अमरनाथ येथे ढगफुटी होऊन निर्माण झालेल्या परिस्थितीत आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील ३९ भाविक अडकले आहेत. यातील २८ भाविक वरच्या भागातून खाली आले असून, उर्वरित ११ जण अजून डोंगरावरच आहेत. प्रशासन या भाविकांच्या संपर्कात असून, सर्वजण सुखरूप असल्याची माहिती तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी दिली. धामणगाव येथून ता.५ जुलै रोजी ३९ भाविक अमरनाथ यात्रेला (Amarnath Yatra) गेले होते. ढगफुटीमुळे हे सर्वजण अडकून पडले होते. त्यातील २८ भाविक बालटल येथे सुखरूप खाली आले आहेत तर ११ जण अद्याप वर डोंगरातच अडकले आहेत. (Beed’s 39 Devotees Stranded In Amarnath, All Are Safe)
अडकून पडलेल्या भाविकांच्या सुटकेसाठी एनडीआरएफ जवान व भारतीय लष्कराकडून मदतकार्य सुरू आहे. धामणगाव परिसरातून अमरनाथ येथे कैलास खिलारे (सांगवी पाटण), धामणगाव येथून काका पोकळे, संदीप चौधरी, संतोष मरकड, दिनेश पोकळे, भरत चौधरी, महेश लोखंडे आणि इतर व काही महिला भाविक असे ३९ जण भाविक भक्त गेलेले आहेत. त्यातील २८ जण खाली बालटल येथे सुखरूप तर अजूनही ११ जण वर अडकले आहेत. ढगफुटीनंतर काका पोकळे, कैलास खिलारे यांच्याशी डॉ. राजेश झिंजुर्क आणि सामाजिक कार्यकर्ते समीर शेख यांनी संपर्क साधून माहिती घेतली. (Beed Upates) नेत्यांकडून विचारपूसढगफुटीमुळे आष्टी तालुक्यातील ३९ भाविक अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर आमदार सुरेश धस, धनंजय मुंडे, आमदार बाळासाहेब आजबे, जिल्हा परिषद सदस्य सतीश शिंदे यांनी भाविकांशी संपर्क साधून त्यांची विचारपूस करीत धीर दिला. तसेच प्रशासनालाही मदत करण्याची विनंती केली. घरी येण्याची राज्य सरकारने सोय करावी अशी मागणी केली गेली आहे.
अमरनाथमध्ये अडकलेले भाविक
संतोष मरकड, सूरज वाढेकर, भाऊसाहेब पोकळे, भरत चौधरी, बापू शिंदे, छाया शिंदे, प्रयागा पोकळे, मणीराम खोजा, अशोक मंडा, किरण थोरवे, उषा पोकळे हे अकरा भाविक डोंगरावर अडकले आहेत. सर्वजण प्रशासन व कुटुंबाच्या संपर्कात असून, सुखरूप असल्याचे त्यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here