जामखेड न्युज – – – – – – –
महाराष्ट्रातील (Maharashtra) राजकारण सध्या जोरदार घमासान सुरु आहे. शिवसेना (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे पक्षाचे ४० पेक्षा जास्त आमदार (MLA) घेऊन ते गुवाहाटी (Guwahati) ला गेले आहेत. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीचे परिणाम महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर होताना दिसत आहे. लवकरच शिवसेना बाळासाहेब ठाकरे नावाचा नवा पक्ष असेल अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
ADVERTISEMENT

आसाममधील गुवाहाटी (Guwahati) येथे शिवसेनेच्या आमदारांसह मुक्काम ठोकलेले एकनाथ शिंदे नवा पक्ष स्थापन करू शकतात. या पक्षाचे (New Party) नाव शिवसेना बाळासाहेब ठाकरे असेल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून विधानसभेतून अपात्र होण्यासाठी दबाव असताना ही बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर म्हणाले की, आमच्या गटाला शिवसेना बाळासाहेब म्हटले जाईल. आम्ही कोणत्याही पक्षात विलीन होणार नाही.