जामखेड न्युज – – –
शिक्षण परिषदेमध्ये गणेश देवकाते यांनी “शाळा सुटली टन् टन् टन्” चला शाळेला जाऊ हे गीत सर्व शिक्षकांसमवेत नृत्य करून सादरीकरण केले यावेळी सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी नृत्य सादरीकरण केले यामुळे शिक्षकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आणी आता शाळेत गेल्यावर आम्ही विद्यार्थ्यांपुढे गीत नृत्य करून सादरीकरण करणारच असा निर्धार केला. यामुळेच मुलांना शाळेत आनंदच वाटेल शाळेची ओढ लागेल.
साकत केंद्राची शिक्षण परिषद कालिका पोदार लर्न स्कुल मध्ये खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली
शिक्षण परिषदेमध्ये केंद्रप्रमुख मल्हारी पारखे, संदिप ओझा, विजय जाधव, वाय. बी. नागरगोजे, राजकुमार थोरवे, बाजीराव गोपाळघरे, तय्यब शेख, रजनीकांत साखरे, बाळू मोरे, अर्जुन रासकर, त्रिंबक लोळगे, बाजीराव गर्जे, अशोक घोलप, सचिन वराट बळीराम जाधव, मीना बोडके, मंजुषा सोले, अभिमान घोडेस्वार, चंद्रकला खरफुडे, मोहारे सुभाष, आशा वराट, भगवान समुद, अर्जुन घोलप यांच्या सह सर्व साकत शिक्षक व शिक्षिका हजर होत्या
यावेळी सेतू अभ्यास व विद्या प्रवेश याविषयी गणेश देवकाते यांनी मार्गदर्शन केले तसेच शाळा सुटली टन् टन् टन् गीतावर स्वतः नृत्य सादर केले व सर्वाना बरोबर घेऊन नृत्य सादर केले सर्व शिक्षकांनी सांगितले की, शाळेत गेल्यावर नृत्य सादर करणार असे सांगितले
ADVERTISEMENT

केंद्रप्रमुख मल्हारी पारखे यांनी प्रशासकीय विषय याविषयी माहिती दिली. शालेय गणवेश, शालेय पोषण आहार, स्वच्छता, शालेय रेकॉर्ड, दप्तर मुक्त शाळा, योगदिन, मोफत पाठय़पुस्तके वाटप, धान्यादी माल, याविषयी मार्गदर्शन केले.
Redy to me उपक्रमांविषयी बळीराम जाधव यांनी सविस्तर माहिती दिली, तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम सादरीकरण मीना बोडके, पुस्तक परिचय मंजुषा सोले यांनी टिचर पुस्तकाविषयी माहिती दिली
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री साकेश्वर विद्यालयातील शिक्षक सुदाम वराट होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिंदे तुकाराम यांनी केले तर आभार संदिप ओझा यांनी मानले