जामखेड न्युज – – – –
दहावीचा निकाल (10th result) लागल्यापासून सोशल मीडियावर एक फोटो प्रचंड व्हायरल होतो आहे. फोटोत एक मुलगा कपाळाला भंडारा लावून घोड्यावर बसला आहे, त्या फोटोशेजारीच दुसऱा फोटो आहे तो त्या मुलाच्या गुणपत्रिकेचा अर्थात ऑनलाईन मार्कलिस्टचा. (Online Mark list) दहावीचा निकाल लागला की, ग्रामीण, शहरी भागातील कष्टकरी मुलांनी दहावीच्या परीक्षेत कसं यश मिळवलं त्याच्या त्या सुरस कथा सांगितल्या जातात. त्या कथेतून तथ्यही असत. कोण आई वडिलांविना शिकलेल असतं तर कोण पेपर टाकून, चहाच्या टपरीवर काम करून तर हेमंत बिरा मुढे (Hemant Bira Mudhe) सारखा एखादा विद्यार्थी असतो. रोज 12-13 किलो मीटरची पायपीट करूनही हेमंतने दहावीमध्ये 92 टक्के गुण मिळवले आहेत.
ADVERTISEMENT

हातात लगाम खेचून धरले
दहावीच्या निकालानंतर हेमंत बिरा मुढेचाही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्याचा फोटोही अगदीच खास आहे. घोड्यावर बसलेला आणि हातात लगाम खेचून धरलेला असा. हेमंतचे दहावीतील गुण बघून तो फोटो तंतोतंत त्याच्या परिस्थितीला जुळत असल्यासारखेच वाटणारे आहे. कारण त्याच्या गुणपत्रिकेतील गुण बघून वाटतं त्याने त्याच्या परिस्थितीचेही लगाम आपल्या कष्टाच्या जोरावर आपल्या हातात ठेवले आहेत. कारण हेमंत मुढेची दहावी सहज साध्य नव्हती.
दररोज पाच-सहा किलोमीटरची पायपीट
हेमंत बिरा मुढे हा सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील शेंडगेवाडी गावातील दहावीचा विद्यार्थी. हेमंतचे आई वडील त्यांची स्वतःची मेंढरं घेऊन गावोगावी फिरत असतात. त्यामुळे हेमंतच्या घरी तो आणि त्याचा भाऊ असे दोघेच राहतात. आई वडील घरी नाहीत, म्हणून उनाडक्या करणार फिरणार नाहीत. मात्र दररोज पाच-सहा किलोमीटर खडकाळ माळरानाचा प्रवास करुन शाळेत जाणार म्हणजे जाणारच. हा त्यांचा नित्यनियम आहे. ज्या प्रमाणे ते शाळेसाठी घरापासून ते शाळेपर्यंत पाच सहा किलो मीटरची पायपीट करून शाळेला जातात त्याच प्रमाणे ते पुन्हा तेवढाच प्रवास करुन घरी परतत. हेमंतच्या घरी मेंढरं बकरी असली तरी त्यांची आर्थिक परिस्थिती मात्र हलाखीचीच आहे.
शाळा शिकण्याची जिद्द
या परिस्थितीतही त्या दोघा भावानी आपली शाळा शिकण्याची जिद्द त्यांनी सोडली नाही. रोज बारा तेरा किलोमीटर चालत येऊ जाऊनही हेमंतने शाळेत कधी खंड पडू दिला नाही वा आपल्या परिस्थिीतीचे कधी भांडवलही केला नाही. आपल्या शिकण्याची अफाट जिद्दीव आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन त्याने दहावीला 92 टक्के गुण प्राप्त केले आहेत.
दहावीत यशाचा झेंडा
हेमंत मुंढे दहावी उत्तीर्ण झाला आहे त्याचे कौतुक जेवढे त्याच्या आई वडिलांना नसेल तेवढे कौतुक त्याच्या आसापसाच्या लोकांना वाटले आहे. सोशल मीडियावर त्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर मात्र त्याच्या आई वडिलांना आपल्या मुलानं काबाडकष्ट करून दहावीत यशाचा झेंडा रोवला आहे याचा मात्र त्यांना प्रचंड आनंद झाला आहे.