वाटाघाटी करायला गेलेले फाटकही गेले शिंदे गटात!!!

0
194
जामखेड न्युज – – – – 
बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची मनधरणी करण्यासाठी सुरताला गेलेले रविंद्र फाटकच (Ravindra Phatak) शिंदेंच्या गटात सहभागी झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी फाटक एकनाथ शिंदेचे मन वळवण्यासाठी सुरत येथील हॉटेलमध्ये गेले होते. त्यानंतर आज आता ते थेट गुवाहटी येथे दाखल झाले आहेत. त्यामुळे आता शिंदेंच्या गटात सहभाग होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत असून, राज्यात सत्तांतराचे वारे आता जोरात वाहू लागले आहे. (Eknath Shinde Latest News In Marathi)
                        ADVERTISEMENT
दरम्यान, काही वेळापूर्वी रविंद्र फाटक यांच्यासह कृषीमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आणि संजय राठोड (Sanjay Rathod) हेसुद्धा गुवाहटीमध्ये दाखल झाले झाले आहेत. रविंद्र फाटक हे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जातात. मात्र, आता तेच शिंदेंच्या गटात सहभागी होत असल्याने शिवसेनेची अंतर्गत नाराजी आणि वाद चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरेंचें निकटवर्तीय असणारे फाटक विधान परिषदेचे आमदार आहेत. एवढेच नव्हे तर, मंगळवारी मिलिंद नार्वेकर यांच्यासमवेत फाटक मुंबईतून शिंदेची मनधरणी करण्यासाठी सूरत येथे गेले होते. मात्र, आता ते स्वतःच गुवाहटी येथे जाऊन शिंदेंना सहभागी झाल्याने शिवसेनेच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here