जामखेड न्युज – – – – –
जामखेड येथे मा.रावसाहेब रोहोकले प्रणित गुरूमाऊली मंडळाच्या शिक्षक बँक निवडणूक प्रचार कार्यालयाचे उदघाटन शाश्रोक्त पद्धतीने विधिवत पूजा करून शिक्षकांचे राज्यनेते मा. रावसाहेब रोहोकले गुरूजी यांचे हस्ते करण्यात आले ,त्यापूर्वी रावसाहेब रोहोकले यांनी जामखेड शहरातील शाळांना भेटी देऊन मार्गदर्शन केले, खर्डा व जवळा येथे स्थानिक शिक्षकाच्या बैठका घेऊन संवाद साधला.
या वेळी उपस्थित शिक्षक बंधू भगिनींना मार्गदर्शन करतांना मा. रोहोकले गुरूजी म्हणाले माझे कुटुंब एवढाच माझा परिवार नसून जिल्ह्य़ातील सर्व शिक्षक हे माझा परिवार आहे त्यामुळे नोकरीतून सेवानिवृत्त झालो आहे परंतू शिक्षकांच्या सेवेतून मात्र निवृत्त झालो नाही. त्यामुळे शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी अविरत शिक्षकांच्या सेवेत आहे.
तसेच शिक्षक बँकेचे साडेतीन वर्षे चेअरमन असताना केलेला पारदर्शक कारभार , सभासद हिताच्या राबविलेल्या विविध योजना याबाबत माहिती सांगून जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातील शिक्षकांशी असलेल्या संर्पकामुळे शिक्षक बँकेच्या निवडणुकीत विजय आपलाच आहे असे म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुरूमाऊली म॔डळाचे तालुकाध्यक्ष श्री हनुमंत निंबाळकर यांनी केले. शिक्षक परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री राम निकम मार्गदर्शन करताना म्हणाले शिक्षक परिषद व गुरूमाऊली मंडळाचा प्रचार संपूर्ण जिल्ह्य़ात अतिशय नियोजनबद्ध पणे चालू आहे . आपण प्रचारात घेतलेली आघाडी हेच आपल्या विजयाचे गमक आहे , यावेळी शिक्षक बँकेच्या संचालक सौ. सिमाताई निकम , महिला आघाडीच्या अध्यक्षा श्रीम मनिषा वाघ , श्रीम.शर्मिला मोटे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विजयकुमार रेणुके सर यांनी केले तर उपस्थितांचे आभार बँकेच्या संचालक मा. सौ. सिमाताई निकम यांनी मानले.
कार्यक्रमास सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी श्री लक्षमीकांत देशमुख साहेब , जिल्हा उच्चाधिकार समितीचे कार्याध्यक्ष वैजिनाथ गिते , जिल्हा कार्यकारिणी सदस्य नारायण लहाने शिवाजी हजारे, संजय उंडे ,शिक्षक परिषद तालुकाध्यक्ष राजेंद्र मोहळकर , युवा परिषद अध्यक्ष राजू कर्डिले यांचेसह संतोष वांडरे, अमर चिंचकर , अनिल कुलकर्णी, चंद्रकांत पांडुळे, गणेश चव्हाण, नवनाथ हजारे , पारधी सर, ईश्वर गवळी, मनोज दळवी , गाडे सर , ज्ञानोबा राठोड , चव्हाण सर, दिपक तांबे , नितेश महारनवर, अभिमान घोडेस्वार, प्रविण पवार, अतुल कोल्हे, डुंपलवाड सर ,घोडे सर संतोष देशमुख, मच्छिंद्र देशमुख , शेखर घुमरे , किरण दापेगावकर , हजारे मॅडम निंबाळकर मॅडम, मनीषा वाघ मॅडम,शर्मिला मोटे मॅडम,सोरटे मॅडम, प्रतिभा कुलकर्णी मॅडम, बहिर मॅडम , मीनाताई कांबळे मॅडम ,राणी नन्नवरे मॅडम, ज्योती रासकर मॅडम, रिता कुलकर्णी मॅडम इत्यादी सह बहुसंख्य शिक्षक बंधुभगिनी उपस्थित होते.