जामखेड न्युज – – – –
शिवसेनेचे प्रबळ नेते आणि महाविकास आघाडीतील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारलं आहे. त्यांच्यासोबत शिवसेनेचे जवळपास दोन तृतियांश आमदार असल्याचा दावा एकनाथ शिंदे वारंवार करत आहेत. अशातच आता शिवसेनेतीव महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक असलेले गुलाबराव पाटीलही एकनाथ शिंदे असलेल्या आसाममधील गुवाहाटी हॉटेलच्या दिशेनं रवाना झाले आहेत. त्यामुळे मंत्री गुलाबराव पाटीलही एकनाथ शिंदेंच्या गटात सामील होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. शिंदेंच्या गटात आता शिवसेनेच्या 46 आमदार असल्याचा दावा केला जात आहे.
ADVERTISEMENT

काही दिवसांपूर्वीच ‘मी डब्बा अन उद्धव ठाकरे माझे इंजिन उद्धव ठाकरे, जिकडे सांगतील तिकडे मी जाईन’, असं काही दिवसांपूर्वी गुलाबराव पाटील म्हणाले होते. अशातच आता राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील गुवाहाटीकडे रवाना झाल्याची माहिती एबीपी माझाला शिवसेनेतील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.