जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
शहरातील समर्थ मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटलतर्फे बुधवार दि. २२ जून रोजी सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत सर्व रोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे तरी गरजू रुग्णांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन हाॅस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. भरत दारकुंडे यांनी केले आहे.

शिबीरात अंगावरून पांढरे जाणे, मासिक पाळी रक्तस्त्राव होणे, गरोदर माता, गर्भपिशवीला गाठ, मायांग बाहेर पडणे, गर्भपिशवीला सुज येणे, वंध्यत्व स्त्री बीजकोशात गाठी असल्यास, स्तनातील गाठी, तांबी बसवणे ( काॅपर टी), संधीवात , आमवात, अॅपडिक्स, मुळव्याध, भगिंदर, हर्निया, मणक्याचे विकार, मधुमेह, रक्तदाब, अर्धांगवायू, सर्व प्रकारचे त्वचा विकार, गुडघे दुखी, सांधे दुखी, पाट दुखी, कुटुंब नियोजन सल्ला व उपचार या सर्व आजारांवर उपचार व मार्गदर्शन करणार येणार आहे.
शिबीरासाठी डॉ. अमोल भगत एम डी मेडिसीन ह्रदय रोग व मेंदू तज्ञ, डॉ. आशा भगत स्त्री रोग तज्ज्ञ, डॉ. भरत दारकुंडे मॅनेजिंग डायरेक्टर असे तज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत तरी शिबीरात येताना जुने रिपोर्ट आणावेत.
जामखेड शहरात सर्व सुविधांनी युक्त असे अद्ययवत
समर्थ मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटल नुकतेच सुरू करण्यात आले आहे या हाॅस्पिटलमध्ये आयसीयु, हार्ट अॅटॅक, सर्पदंश, अर्धांगवायू, हृदयरोग, मधुमेह, शस्त्रक्रिया विभाग, हाडांचे सर्व आॅपरेशन, मेंदू व मणक्यावरील सर्व उपचार व शस्त्रक्रिया, डायलेसिस विभाग, सोनोग्राफी, नाॅर्मल डिलेव्हरी, सिझेरियल डिलेव्हरी अशा सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. विश्वक्रांती चौक बीड रोड जामखेड
शिबीराचे ठिकाण विठ्ठल मंदिर साकत ता.जामखेड जि अहमदनगर संपर्क सुनिल मोरे 7057900503,दिपक भोरे, 9552795005
तरी शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन हाॅस्पिटलचे संचालक डॉ. भरत दारकुंडे यांनी केले आहे.