जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
राजुरी (कोल्ह्याची) ता. जामखेड येथील गरीब कुटुंबातील मुलगी कु. प्रतिक्षा बाळासाहेब राऊत हीने इयत्ता १० वी च्या परीक्षेत ९४ टक्के घेऊन शाळेत प्रथम क्रमांक पटकाविला.
घरची परिस्थिती हलाखीची आसताना खडतर अभ्यास करुन तिने हे नेत्रदीपक यश संपादन केले आहे. तीच्या यशाबद्दल तीला विचारले आसता तीने सांगितले की शाळेत शिकवलेले मन लावुन लक्ष देणे, घरी पुस्तकांचे वाचन, महत्त्वाच्या मुद्दांच्या नोट्स काढणे, गणितातील उदाहरणांचा पुन्हा पुन्हा अभ्यास करणे, ही माझ्या अभ्यासाची पध्दत होती. मी गाईड आणि अपेक्षित कधी वाचले नाहीत. कारण माझ्या वडीलांची पुस्तके खरेदी करण्याची आर्थिक परिस्थिती नव्हती त्यामुळे मी कधी त्यांना पुस्तके घेण्यास आग्रह केला नाही, वर्गात शिकवलेले आणि पुस्तकातील धडे याचा मी जास्त अभ्यास केला.
तीच्या यशा बद्दल न्यूज इंग्लिश स्कूल राजुरीचे मुख्याध्यापक झुल्लफिकार पठाण, दत्तात्रय राजमाने, दिपक सुरवसे, त्रिंबक लोळगे, भरत लहाने, सुनिता पिसाळ, दिनेश शिंदे, कैलास वराट, हुलगुंडे सर, हनुमान राऊत, उमराव लटपटे, नवनाथ सदाफुले इ. सरांचे तीला मोलाचे मार्गदर्शन लाभले. तीच्या या अलैकिक यशाबद्दल जगताप सर बीड, बाळु राऊत, गणेश सांगळे सरपंच गणेश कोल्हे, माजी सरपंच सुभाष काळदाते, पोलीस पाटील दत्तात्रय मोरे, सागर कोल्हे, रामभाऊ राऊत, काकासाहेब कोल्हे यांनी कौतुक केले आहे.