जामखेड तालुका शिवसेनेच्या वतीने वर्धापनदिनानिमित्त निवारा बालगृहातील अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्य व मिठाईचे वाटप

0
296

जामखेड प्रतिनिधी

           जामखेड न्युज – – –
शिवसेनेच्या ५६ व्या वर्धापनदिनानिमित्त आज जामखेड तालुका शिवसेनेच्या वतीने निवारा बालगृहातील अनाथ मुलांना फळे व मिठाईचे वाटप करण्यात आले. ८०% समाजकारण व २० % राजकारण या तत्त्वावर आजही शिवसेना काम करत आहे.
   ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृह मोहा फाटा (समता भुमी)ता-जामखेड जि. नगर याठिकाणी अनाथ, निराधार, लोककलावंत, ऊसतोड मजूर, वीटभट्टी कामगार , दलित,भटके-विमुक्त, आदिवासी, वंचित व दुर्लक्षित घटकातील गोर-गरिब, कष्टकऱ्यांच्या  मुलां-मुलीच्या शिक्षणासाठी सुरू असलेल्या निवारा बालगृहात 84 मुलां- मुलींना नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश दिला असून या मुलांचे स्वागत करण्यासाठी   वह्या व 1 पेन,गोड खाऊ,केळी देण्यात आली.
   यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद, युवा सेना तालुकाप्रमुख सावता हजारे, शिवसेना शहरप्रमुख गणेश काळे, उपशहरप्रमुख अवी बेलेकर, चंदन अंधारे, युवा सेना शहरप्रमुख सुरज काळे, खर्डा गट युवा सेना सुहास मदने, जगदंबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर गुंदेचा, किरण ओझर्डे,
अभी चिंचकर, किशोर मोहिते( वैद्यकीय सेवा) रोहिणी काशिद, मीना बेलेकर, ज्योती राऊत, निलम उगले, वैशाली शिंदे, पुनम मोहिते यांच्या सह अनेक शिवसैनिक उपस्थित होते. तसेच निवारा बालगृह अधीक्षक वैजीनाथ केसकर, तरडगावच्या सरपंच सौ संगीता केसकर,व विद्यार्थी उपस्थित होते.
 कार्यक्रमाचे सुत्रसंचलन निवारा बालगृहाचे प्रकल्प समन्वयक संतोष चव्हाण सर यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here