Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या ताई आता हा चेहरा शिवसेनेतच शोभून दिसेल कार्यकर्त्यांच्या भन्नाट कमेंट

ताई आता हा चेहरा शिवसेनेतच शोभून दिसेल कार्यकर्त्यांच्या भन्नाट कमेंट

0
260
जामखेड न्युज – – – 
विधान परिषदेची (MLC Election) संधी नाकारण्यात आल्यानंतर मौनात गेलेल्या पंकजा मुंडे यांनी आज एक सूचक कृती केलीय. भाजपात वारंवार डावलल्या गेलेल्या पंकजा ताईंनी आता काहीतरी ठोस निर्णय घ्यायलाच पाहिजे, अशी अपेक्षा सर्व पक्षीय नेते तसेच कार्यकर्त्यांना आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा ताईंनी (Pankaja Munde) त्यांच्या ट्विटर हँडलचा प्रोफाइल फोटो बदलला. नव्या दमाचा, फ्रेश आणि अत्यंत आत्मविश्वास पूर्ण असा हा फोटो पाहून त्यांचे चाहते आणि कार्यकर्त्यांमध्येही (Pankaja Supporters) उत्साह संचारला आहे. हा फोटो पाहून कार्यकर्त्यांच्या एकापेक्षा एक भन्नाट कमेंट्स येत आहेत. आता संघर्ष अटळ आहे, लोकनेत्या, ताईसाहेब…, रणरागिणी अशा अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यातच ताई, आता हा चेहरा शिवसेनेतच शोभून दिसेल… अशीही कमेंट दिली आहे. पंकजा मुंडे यांनी ट्विटरचा बदललेला हा फोटो आज मराठवाड्यातील सोशल मीडियात प्रचंड चर्चेत आहे.
हे तेज, आत्मविश्वास, काय सांगतोय फोटो?
पंकजा मुंडे यांनी आज ट्वीट केलेल्या फोटोतून काहीतरी सूचक संकेत मिळतायत, अशी चर्चा आहे. आपण नाराज असूनही प्रचंड आत्मविश्वासाने पुन्हा एकदा युद्धासाठी तयार आहोत, असा अर्थ त्यातून सुचवायचा आहे. की एखाद्या नव्या मोहिमेसाठी आपण सज्ज आहोत, असं त्यातून सांगायचंय… असे असंख्य तर्कवितर्क लावले जात आहे.
मौनातून अस्वस्थता बोलतेय?
विधान परिषदेची उमेदवारी मिळाली तर संधीचं सोनं करीन असं सूचक विधान पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिना निमित्तच्या कार्यक्रमात केलं. भाजप नेतृत्वाकडून ही संधी दिली जाईल, अशी अपेक्षा पंकजा मुंडेंना होती. भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली. त्यात पंकजा मुंडेंना डावलण्यात आलं. त्यानंतर मात्र पंकजा मुंडेंची एकही प्रतिक्रिया आली नाही. बोलतायत ते त्यांचे कार्यकर्ते. मराठवाड्यातील अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी त्यांची अस्वस्थता दर्शवली. देवेंद्र फडणवीस बोलले, चंद्रकांत पाटील बोलले, पण पंकजा मुंडेंचं मात्र यावर मौन आहे. या मौनातूनच त्यांनी अस्वस्थता बोलतेय की काय, अशीही शंका व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!