सदिच्छा मंडळाला मोठे खिंडार, अनेकांचा गुरुमाऊली मंडळात प्रवेश जामखेडमध्ये गुरुमाऊली मंडळाचा २०१५ शिक्षक मेळावा संपन्न

0
340
जामखेड प्रतिनिधी 
               जामखेड न्युज – – ( सुदाम वराट) 
जिल्हा शिक्षक बँकेच्या पार्श्वभूमीवर जामखेड येथे गुरुमाऊली मंडळाचा २०१५ शिक्षक मेळावा संपन्न झाला. यामध्ये जामखेड तालुक्यातील सदिच्छा मंडळाचे नेते केशव गायकवाड, पदवीधर शिक्षक शाकीर शेख, प्रविण ढगे, भगवान समुद, किरण दापेगावकर, निलेश गरड, अर्चना ढगे, गुरूकुल नेते कै. बिबिषण डिसले यांच्या पत्नी राधा डिसले, उर्मिला बहिर, विजयकुमार रेणुके, बाळासाहेब बर्डे, रावसाहेब बांबळे, रवि पवार, नितीन पवार, दिनेश मोहोळकर, अमोल घाटुळे, जानकीराम खामगळ, अंबादास गाडे यांचेसह असंख्य कार्यकर्त्यानी प्राथ.शिक्षक संघ व गुरूमाऊली मंडळात प्रवेश केला.
     
   जामखेड येथे मोठय़ा उत्साहात गुरूमाऊली मंडळ २०१५ चा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. या जिल्हयातील १२ वा मेळावा आणि १२ इच्छुक उमेदवारांनी बँकेच्या व विकास मंडळ संचालक पदाची उमेदवारी मागितली. तालुक्यातील दिडशे ते दोनशे सभासदांचा हा मेळावा अभूतपूर्व ठरला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिगांबर पवार (बापू) तर शिक्षक नेते बापूसाहेब तांबे, केशव गायकवाड, कार्यकारी अध्यक्ष गोकुळ कळमकर, माजी चेअरमन शरदभाऊ सुद्रिक, माजी व्हाइस चेअरमन अर्जन शिरसाठ, सुयोग पवार, अनिल टकले, गौतम साळवे, कर्जतचे अध्यक्ष बाळासाहेब तापकीर,पाथर्डीचे अध्यक्ष भिमराव चाचर, दिपक चव्हाण, विश्वस्त गोकुळ गायकवाड, शोभा कांबळे/घायतडक, राधा डिसले, दक्षिण जिल्हा प्रमुख छाया जाधव, तालुकाध्यक्ष निशा कदम यांच्या मार्गदर्शनाने हा सुंदर असा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला.
                         Advertisements  
    गुरूमाऊली मंडळात बापूचे नेतृत्व आणि बँकेचा कारभार यामुळे सभासद तर समाधानी व आनंदी आहेत. आज केशव गायकवाड आणि सर्व मित्र परिवाराच्या प्रवेशाने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मंडळाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग मोहळकर यांनी त्यांच्या खास शैलीत केले. साडेतीन वर्षांचा कारभार आणि तीन वर्षांचा कारभार सभासदांसमोर मांडला. जामखेड तालुका प्राथ. शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष गणेश नेटके, संभाजी कोकाटे, जामखेड तालुका प्राथ.शिक्षक संघाचे सरचिटणीस रामहरी बांगर, दक्षिण जिल्हाध्यक्ष छाया जाधव यांनीही मंडळाने बँकेच्या कामाचे व बापूंचे कौतुक केले व मंडळाची भुमिका विषद केली.
यावेळी इच्छुक उमेदवार राजीव मडके, विकास बगाडे, पांडुरंग मोहळकर, नाना मोरे, संतोषकुमार राऊत, मुकुंदराज सातपुते,कल्पना गायकवाड, किसन वराट, निशा कदम, सविता साठे, बाबा कुमटकर, एकनाथ चव्हाण या सर्वांनी विकास मंडळ व बँकेसाठी उमेदवारी मागितली. अर्जुन शिरसाठ यांनी बँकेचे घेतलेले चांगले निर्णय, स्टाप पॅटर्न १४५ वरून १०५  केला, अशा अनेक निर्णयामुळे व्याजदर कमी करता आले. घडयाळ खरेदी ६०लाख मात्र ८५ लाख लुटल्याचा आरोप होतो. असेच सर्व आरोप आहेत. एक साधा विचार करा. एक बँकेची जागा भरण्याचा खुसकीचा मार्ग ३०-४० लाखांचा तर नक्की आहे. ४० जागा २१ संचालक मग बघा दुसरे काही करण्याची गरज होती का? आम्ही त्यावरच पाणी सोडले. गोकुळ कळमकर यांनी बोलताना सदिच्छाची विचारसरणी पहिल्यासारखी राहिली नाही. अयोग्य माणसाबरोबर काम करणं शक्य नसल्याने योग्य माणसाबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला, त्याचे समाधान आहे. रोहकले गुरूजीचे नाव न घेता यांचे भागले आता यांना स्वतःच्या नात्याचा चेअरमन व बँकेचा MD करण्याचा डाव आपण ओळखला पाहिजे. यावेळी बोलताना केशव गायकवाड यांनी शिक्षक संघ व सदिच्छा मंडळातील कार्य विशद केले व गेल्या पाच वर्षात गुरुमाऊली मंडळाने केलेले कार्य हे कौतुकास्पद असल्यामुळे आपण गुरुमाऊली मंडळात प्रवेश करत असल्याचे विशद केले. चांगल्याला चांगले म्हणण्याची  दाणत असावी लागते, गुरुमाऊली मंडळाने गेल्या पाच वर्षात सभासदाभिमुख कारभार करून व्याजदर कमी करून कायम ठेव व शेअर्स  यावर निश्चितच चांगल्याप्रकारे व्याजदर दिला आहे, असे मत यावेळी यांनी व्यक्त केले.शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांनी आपण चांगले काम घेवूनच सभासदापुढे जात आहोत. आरशासारखा कारभार संचालक बोर्डाने केला आहे. तो स्वच्छ आरसा समोर आहे. जो तो स्वतःच्या प्रमाणे त्यात पहात आहे. ज्याच्या त्याच्या प्रमाणे जो जसा आहे तसा तो दिसणार त्यामुळे टिकाकांराच्या नादी लागू नका. त्यांना उत्तरे देण्यात वेळ घालू नका. त्याच वेळेत दहा सभासदांना आपण आपला कारभार सांगा ८.७० टक्के वरून ७ टक्के व्याजदर पुढील पाच वर्षात करणार, गुरूमाऊली मंडळाची वचनपूर्ती असते. जे सांगितले ते तर केलेच त्याहून जास्तीचे केले. त्यामुळे निश्चिंत रहा.७ टक्के व्याजदर नक्की करणार.
   शिक्षक बँक व विकास मंडळाच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही पदाची अपेक्षा न धरता केशव गायकवाड यांनी केलेला प्रवेश हा निश्चितच गुरुमाऊली मंडळाला ताकद देणारा आणि त्याचे धोरणाला पाठिंबा देणारा आहे असे मत यावेळी  बापूसाहेब तांबे यांनी व्यक्त केले.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुकाध्यक्ष एकनाथ चव्हाण यांनी तर आभार विश्वस्त गोकुळ गायकवाड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राज्य संघाचे जामखेड तालुका सदस्य, जामखेड तालुका प्राथमिक शिक्षक संघ, गुरुमाऊली मंडळ, महिला आघाडी, उच्चाधिकार समिती सर्व सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी शोभा कांबळे, राधा डिसले, निशा कदम, श्रीमती छाया जाधव, श्रीमती कल्पना गायकवाड, श्रीमती आशा नेटके,  कल्पना ससाणे, सौ. शीतल काळे, सौ. अर्चना ढगे, मीना बोडके,  सविता साठे, शबाना शेख,  प्रतिभा कुलकर्णी, सुलभा विधाते,  उर्मिला बहिर व बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.
प्रवेशित सर्व मान्यवरांचे स्वागत जिल्हाध्यक्ष व शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांनी केले.
केशर हॉलचे संचालक डॉ. गायकवाड यांनी कार्यक्रमासाठी हॉल मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्हा नेते बापूसाहेब तांबे यांनी त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here