संभाजी वाटाणे यांच्या तर्फे निवारा बालगृहास ५ क्विंटल अन्नधान्य वाटप.

0
227
जामखेड प्रतिनिधी
             जामखेड न्युज – – – 
 येथील ग्रामीण विकास संचालित निवारा बाल गृहातील अनाथ निराधार, वंचित घटकांतील मुला मुलींसाठी प्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक आयेशा हुसेन, सावन पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक जागृती फटांगरे यांच्या हस्ते यश मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक संभाजी वाटाणे यांनी ५ क्विंटल ज्वारी, बाजरी, गहू असे अन्न धान्य वाटप केले.
 
यावेळी त्याच्या समवेत चालक गीते पाटील, जामखेड येथील  यादव मोटार ड्रायव्हिंग स्कूल चे संचालक जगदीश यादव, दत्त कृपा मोटार ड्रायव्हिंग स्कूल चे संचालक शिवाजी देवकर, ओम मोटार ड्रायव्हिंग स्कूल चे संचालक संदीप गर्जे, अनिल काशीद, निखिल जाधोर, अतुल गव्हाणे आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी मोटार वाहन निरीक्षक आयेशा हुसेन यांनी निवारा बाल गृहातील विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्याशी थेट संवाद साधला. निवारा बालगृहामध्ये अनाथ, निराधार, घटकांतील विद्यार्थी विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकास होत असल्याचे पाहून समाधान व्यक्त केले. या वसतिगृहात शिकणाऱ्या मुला, मुलींना कपडे व चप्पल भेट देण्यात आली.
दत्त कृपा मोटार ड्रायव्हिंग स्कूल चे संचालक शिवाजी देवकर यांनी १ क्विंटल धान्य देण्याचे जाहीर केले तर ओम मोटार ड्रायव्हिंग स्कूल चे संचालक संदीप गर्जे यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य भेट देणार असल्याचे जाहीर केले.
यावेळी निवारा बाल गृहाच्या विद्यार्थिनी सिता केसकर व गीता बर्डे यांनी गीत सादर केले. सायली गुंजिते हिने नृत्य सादर केले. वस्तीगृह अधिक्षक वैजिनाथ केसकर व प्रसिध्दी प्रमुख भगवान राऊत यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला. प्रकल्प समन्वयक संतोष चव्हाण यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. संगीता केसकर यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here