जामखेड न्युज – – –
जामखेड तालुक्यातील साकत येथिल श्री साकेश्वर विद्यालयात इयत्ता पाचवी ते आठवीच्य मुलांना मोफत पाठय़पुस्तके ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीच्या हस्ते वाटप करण्यात आले तसेच नविन विद्यार्थ्यांचे स्वागत सर्व शिक्षकांसमवेत फुलांच्या बागेतच करण्यात आले यावेळी पाठ्यपुस्तके मिळाल्यावर तसेच फुलांच्या बागेत गेल्यावर विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
यावेळी ज्येष्ठ पालक ज्ञानदेव मुरुमकर, माजी सरपंच हरिभाऊ मुरुमकर, पत्रकार बाळासाहेब वराट, भाऊसाहेब मुरुमकर, ब्रम्हदेव मिसाळ, मुख्याध्यापक दत्तात्रय काळे, राजकुमार थोरवे, सुदाम वराट, अर्जुन रासकर, महादेव मत्रे,
अशोक घोलप, त्रिंबक लोळगे, सुलभा लवुळ, विजयकुमार हराळे, अतुल दळवी, आण्णा विटकर, आश्रु सरोदे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विद्यालयात बदली होऊन आलेले शिक्षक अर्जुन रासकर व त्रिंबक लोळगे यांचे स्वागत करण्यात आले. विद्यालयातील पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शासनाचे मोफत पाठय़पुस्तके देण्यात आले तसेच नविन विद्यार्थ्यांना
निसर्गरम्य अशा फुलाच्या बागेत घेऊन जात सर्वाचे स्वागत केले यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वाहत होता.