जामखेड शहरात महावितरणच्या मंजूर केलेल्या 16 किमी केबल लाईनचे काम पूर्ण; आणखी 7 किमी लाईनचे काम सुरू – जामखेडकरांना वीज पुरवठ्यात येणाऱ्या अडचणी होणार दूर

0
152
जामखेड प्रतिनिधी 
            जामखेड न्युज – – – 
 जामखेड शहरासह आसपासच्या परिसरात दुसरा व तिसरा मजला अशी घरे वाढत असल्याने विजेच्या तारा यांचा अडथळा निर्माण होऊन अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही गोष्ट लक्षात घेऊन आमदार रोहित पवार त्यांनी महावितरणसाठी विशेष बाब म्हणून पूर्वी एरियल बंच केबल जामखेड शहरात बसवण्यासाठी उपलब्ध करून दिल्या व त्याचे काम सुरू होते.
 
आतापर्यंत 16 किमी केबल लाईन बसवण्याचे काम पूर्ण झाले असून आणखी 7 किमी केबल उपलब्ध झाली असून त्याचेही काम सुरू करण्यात आले आहे. जामखेड दौऱ्यावर असताना आ. रोहीत पवार यांनी या कामाची माहिती घेतली व महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा केली.
धोकादायक असलेल्या व ओव्हरलोड येत असलेल्या ठिकाणी सर्वप्रथम केबल बदलण्यात आल्याची माहिती यावेळी महावितरणकडून देण्यात आली आहे. या कामाद्वारे तारा तुटून होणारे ग्राहकांचे व कंपनीचे नुकसान टळले जाणार असून संभाव्य अपघात व वीज खंडित होण्याचे प्रमाण कमी होऊन महावितरणच्या महसुलात वाढ होईल तसेच नागरिकांनाही सुरळीत व अखंडित वीजपुरवठा होईल. याशिवाय स्थानिक आमदार निधीमधून आ. रोहीत पवारांनी मतदारसंघात विद्युत रोहित्र उपलब्ध करून दिले असून अजूनही रोहित्र उपलब्ध केले जाणार आहे.  तसेच जीर्ण झालेले पोल बदलण्यासाठी 300 हून अधिक वीजेचे पोल उपलब्ध करून देत इतरही विजेच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी विशेष लक्ष घालून त्या समस्यांवर तात्काळ तोडगा काढला आहे व त्या अडचणी मार्गी लावल्या आहेत. यासोबतच गाव सुंदर व स्वच्छ दिसावं यासाठी आ. रोहीत पवार हे वेळोवेळी प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here