जामखेड न्युज – – – – –
शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये रोहित्र वाहतुकीला अडथळा निर्माण करतात ते स्थलांतरित करावेत, वाकलेले व धोकादायक पोल बदलावेत तसेच लोंबकळणाऱ्या तारा दुरूस्त कराव्यात याचबरोबर वाढीव डिपॉझिट रद्द करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष सुरेश भोसले यांनी महावितरणच्या उपअभियंता यांच्याकडे केली.

आमदार रोहित दादा पवारांच्या अध्यक्षतेखाली महावितरणच्या कार्यालयांमध्ये शहरात चालू असलेल्या विकास कामांची माहिती देण्यासाठी व लाईट संबंधित तक्रार निवारण करण्यासाठी बैठक आयोजित केली होती
यावेळी आमदार रोहित पवार, सुरेश भोसले, ज्येष्ठ नेते प्रकाश सदाफुले राजेंद्र कोठारी दिगंबर चव्हाण राहुल उगले, महावितरणचे उपअभियंता युवराज परदेशी अमित जाधव सह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.

यावेळी महावितरण च्या विविध कामासाठी लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे यासाठी विद्युत विरोधक वायर चा वापर करण्यात येणार आहे त्यामुळे आकडे टाकून मी चोरी करण्याचे प्रमाण कमी होणार आहे.
यावेळी. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष सुरेश भाऊ भोसले यांनी शहरातील अनेक रोहित्र वाहतुकीस अडथळे निर्माण करीत आहेत अशी रोहित्र स्थलांतरित करून दुसऱ्या जागी शिफ्ट करावेत तसेच ग्रामीण भागातील अनेक गावातील पोल गंजले असून वाकडे झालेले आहे व तारा लोंबकळत आहेत यामुळे अनेक ठिकाणी धोके निर्माण झाले आहेत हे बदलण्याची मागणी केली आहे तसेच लाईट बिलामध्ये वाढीव डिपॉझिट भरण्याची शिफारस केली आहे रद्द करावी अशी मागणी केली.