जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
वटसावित्री पोर्णिमेला शहरातील शिवाजीनगर परिसरात वडाचे झाड नसल्याने महिलांना वडाची पुजा करण्यासाठी दूर जावे लागत होते. ही अडचण ओळखून माजी नगरसेवक दिंगाबर चव्हाण यांनी दोन वर्षांपूर्वी शिवाजीनगर परिसरात वीस वडांची झाडे लावली होती त्यांचे चांगले संगोपनही केले आज वटपौर्णिमा असल्याने सकाळीच मित्रमंडळींना बरोबर घेऊन परिसराची स्वच्छता करून सडा रांगोळी करून महिलांसाठी प्रसन्न वातावरण निर्माण केले.

माजी नगरसेवक दिंगाबर चव्हाण यांनी आज सकाळी मित्रमंडळींना एकत्रित घेऊन हातात झाडू घेत परिसर चकाचक केला यावेळी शिक्षक नेते राम निकम, अॅड हर्षल डोके, शिवम चव्हाण, अनिरुद्ध रसाळ यांनी स्वच्छता केली तर हिराबाई दिंगाबर चव्हाण, गौरी पांडुळे, सोनाली पांडुळे, सुवर्णा तांबे, अलका पवार, अनिता तांबे यांनी सडा रांगोळी केली यावेळी स्वाती कुलकर्णी, सिताताई निकम, सीमा कुंजीर, सुजाता लहाने, उषा जसाभाटी, रत्नमाला हजारे, सारीका सोळंकी, शिवानी लहाने, गीरजाबाई डोके, जिजाबाई फाळके, दिपाली थोरात, सुवर्णा फाळके, नेहा फाळके, शिवानी स्वामी, सुनिता बारवकर, अमृता अंधारे, कामिनी राजगुरू, मनिषा पवार, जनाबाई नागरगोजे, ललिता भापकर, वैशाली ढाळे, संगिता पारे, भारती चौधरी यांच्या सह दिवसभर हजारो महिला वडाच्या झाडाची पुजा करण्यासाठी येत होत्या
दोन वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक दिंगाबर चव्हाण यांनी शिवाजीनगर परिसरात वडांची झाडे लावली होती त्यांचे चांगले संगोपन केले उन्हाळ्यात टँकरने पाणी घातले व हि झाडे जगवली त्यामुळे परिसरातील महिलांना वटपौर्णिमेला परिसरात झाडे उपलब्ध झाली आहेत त्यामुळे परिसरातील महिलांनी दिंगाबर चव्हाण यांचे आभार मानले.
दिंगाबर चव्हाण हे अहोरात्र जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी तत्पर असतात. सकाळी व सायंकाळी प्रभागात एक चक्कर मारणे लोकांच्या अडीअडचणी सोडविणे कोठे गटार तुंबलेले असेल तर स्वतः काढणे हि कामे करत असतात.
तीन वर्षांपूर्वी धोत्री परिसरात सुमारे तीनशे झाडांची लागवड केली त्यांच्या संरक्षणासाठी जाळी बसवली व उन्हाळ्यात पदरमोड करून टॅंकरने पाणी घातले त्यामुळे आज परिसर हरित झाला आहे. तसेच पाणी टंचाईच्या काळात स्वतः टॅकरद्वारे पाणीपुरवठा केला धोत्री परिसरात ज्या वस्तीवर जाण्यासाठी रस्ता नव्हता तेथे मुरमीकरण केले पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी कुपनलिका घेतली व मोटार बसवून दिली. दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येते. अशा प्रकारे सतत लोकांच्या अडीअडचणी सोडवणारा हक्काचा माणुस म्हणुन चव्हाण यांच्याकडे लोक पाहतात.