जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
वट पोर्णिमेला वडाचे झाडाचे विशेष महत्त्व आहे. परिसरात वडाचे झाड नसल्याने महिलांना वडाच्या झाडाची पुजा करण्यासाठी दूर अंतरावर जावे लागत होते. ही अडचण ओळखून जामखेड येथिल बाल विकास प्रकल्प अधिकारी ज्योती बेल्हेकर यांनी महिलांना एकत्रीत करून खडी क्रेशर परिसरात वडांच्या झाडांची लागवड केली यामुळे परिसरातील महिलांना दरवर्षी जवळच झाड उपलब्ध होणार आहे.

यावेळी ज्योती बेल्हेकर बाल विकास प्रकल्प अधिकारी, राणी भापकर, सविता नेटके, अनिता नेटके ,अंजली जेधे ,सरिता मिसाळ तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस भोसले बाई, गुंड, बडे, काळे, आडाले, वारे, चटेकर यांच्या सह अनेक महिला भगिनी उपस्थित होत्या.
बाल विकास प्रकल्प अधिकारी ज्योती बेल्हेकर यांनी राबविलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे परिसरातील महिलांनी त्यांचे अभिनंदन करत कौतुक केले आहे.