मराठी साहित्य प्रतिष्ठानचा जामखेडला ‘गझल तरंग ‘ कार्यक्रम

0
215
जामखेड प्रतिनिधी
              जामखेड न्युज – – – 
  मराठी साहित्य प्रतिष्ठानच्या वतीने गुरुवार दि. १६ जून २०२२ रोजी दुपारी अडीच वाजता राज्य स्तरीय ‘गझल तरंग ‘ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे,अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष व प्रसिद्ध लेखक प्रा.आ.य. पवार यांनी दिली.
राज्यातील नामवंत गझलकार प्रा.तुकाराम पाटील, डॉ शेख इक्बाल मिन्ने, डॉ राज रणधीर, डॉ,स्मीता पाटील, डॉ संजय बोरुडे, विनय मिरासे, इंजि.शैलजा कारंडे आदी नामवंतांनी कार्यक्रमात सहभाग घेतला आहे.तहसीदार श्री योगेश
चंद्रे व पी.आय. संभाजराव गायकवाड  प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा.मधुकर राळेभात नुकतेच सेवानिवृत्त झाले असून,
त्यांचे सेवापूर्ती निमित्ताने ‘गझल तरंग’ हा कार्यक्रम श्री नागेश विद्यालयात आयोजित करण्यात आला असल्याचे प्रतिष्ठानचे खजिनदार डॉ जतीन काजळे व सदस्य प्रा मोहनराव डुचे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here