आष्टी येथील ग्रामसेवकास लाच घेताना रंगेहाथ पकडले

0
206
जामखेड न्युज – – – 
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील ग्रामसेवक किरण दगडू वनवे यास 4 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बीड युनिटने आष्टी पंचायत समिती येथे रंगेहात पकडले. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
   
या संदर्भात तक्रारदार याने औरंगाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत लाभार्थीच्या ग्रामपंचायत धनगरवाडी अंतर्गत मिळालेल्या शेततळ्याचे मजुरांच्या केलेल्या कामांचे
बील काढण्याकरिता मोबदला म्हणून ग्रामसेवक वनवे याने तक्रारदारास 5000 रुपयांची मागणी केली होती. मात्र पंचासमक्ष तडजोडी अंती 4000 रुपये देण्याचे ठरले. ही लाचेची रक्कम पंचासमक्ष घेताना ग्रामसेवक वनवे रंगेहात पकडला. ही कारवाई बीड येथील सापळा अधिकारी शंकर शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली पथकाने केली.या पथकात
पोलीस अंमलदार अमोल खरसाडे, अविनाश गवळी, चालक गणेश मेहत्रे सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here