जामखेड न्युज – – –
परिसरातील गोरगरीब गरजू रूग्णांना दृष्टी देण्याचे काम शिंगवी चष्माघरातर्फे करण्यात येत आहे हीच खरी ईश्वर सेवा आहे गोरगरीब जनतेच्या आशिर्वादाने गेल्या ३८ वर्षापासून अखंडपणे काम सुरू आहे. आजपर्यंत त्यांनी लाखो लोकांना दृष्टी देण्याचे काम केले आहे असे मत आंतरराष्ट्रीय सायकलिस्ट शरदराव काळे यांनी व्यक्त केले.
तर रूग्ण सेवा हिच ईश्वर सेवा म्हणून गेल्या ३८ वर्षापासून काम करत आहे याचे खुपच समाधान आहे. असे मत अशोक शिंगवी यांनी व्यक्त केले.
ADVERTISEMENT

स्वर्गीय सुंदरबाई कन्हैयालाल शिंगवी सेवाभावी प्रतिष्ठान व आनंदऋषी नेत्रालय अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने शिंगवी चष्माघर जामखेड येथे ३१५ व्या शिबीराचे आंतरराष्ट्रीय सायकपटू शरद काळे पाटील यांच्या हस्ते
उद्घाटन करण्यात आले यावेळी शिंगवी चष्माघरचे अशोक शिंगवी, अभय शिंगवी, डॉ. पांडुरंग सानप, मोहन डुचे, सुदाम वराट यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शिंगवी चष्माघर जामखेड तर्फे १९८४ पासून म्हणजे ३८ वर्षापासून मोतीबिंदू शस्त्रक्रिया. हे ३१५ व्या शिबीराचे आयोजन करण्यात येते आतापर्यंत दोन लाख दहा हजार रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे यातील नव्वद हजार रूग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत सर्व शस्त्रक्रिया यशस्वी झालेल्या आहेत. ग्रामीण भागातील तसेच जामखेड, करमाळा, पाटोदा, आष्टी, भूम, परांडा सह अनेक तालुक्यातील रूग्णांनी या शिबीराचा लाभ घेतला आहे.
शिबीरातील सुविधा पुढीलप्रमाणे असतात
मोफत शस्त्रक्रिया करून लेन्स अल्पदरात बसविण्यात येतात, शस्त्रक्रिया झालेल्या रूग्णांची तपासणी नेत्रतज्ज्ञामार्फत केली जाते, शिबीरात मोफत औषधोपचार, काळा चष्मा, राहण्याची व जेवणाची सोय मोफत असते, जामखेड ते नगर येण्या जाण्याची मोफत सोय असते.
आजच्या शिबीरात दोनशे पेक्षा जास्त रूग्णांनी आपली नोंदणी केली होती. तर यातील अनेकांचे मोतीबिंदूचे आॅपरेशन होणार आहे.
आंतरराष्ट्रीय सायकलिस्ट शरदराव काळे पाटील यांच्याविषयी माहिती
शरदराव काळे हे अल्ट्रा सायकलिस्ट, अल्ट्रा रनर आहेत
ते भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी लंडनला जाणार आहेत. तसेच अमेरिका व पॅरिसलाही जाणार आहेत.
आतापर्यंत त्यांनी २४ तासात ५०० किलोमीटर सायकलिंग त्यांच्या नावावर मोटारसायकलचेही अनेक विक्रम आहेत त्यांनी अष्टविनायक यात्रा १२ तास १२ मिनिटात केली आहे. तसेच २४ तासात दोन हजार किलोमीटर अंतर पार केले आहे असे अनेक विक्रम त्यांच्या नावावर आहेत.
लंडन मधील सर्वात अवघड सायकल स्पर्धेसाठी सायकलिस्ट काळे पाटील सज्य…
लंडन मधील सर्वात अवघड समजल्या जाणाऱ्या लंडन एडीनबर्ग लंडन ह्या सायकल स्पर्धेत भाग घेण्यासाठी अहमदनगर सायकलिस्टचे ज्येष्ठ सदस्य श्री शरद काळे पाटील हे सज्य झाले आहेत.दर चार वर्षांनी लंडन एडीनबर्ग लंडन ही 1530 किमी ची अवघड स्पर्धा आयोजित केली जाते व त्यामध्ये जगातील कसलेले रायडर भाग घेत असतात.
काळे पाटील यांनी डेक्कन क्लिफ हँगर ह्या स्पर्धेत भाग घेतला होता. ही स्पर्धा वेळेत पूर्ण केल्या बद्दल पुढील वर्षी अमेरिकेत होणाऱ्या रेस अक्रॉस अमेरिका व पॅरिस ब्रेस्ट पॅरिस ह्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी काळे पाटील पात्र झाले आहेत.
लंडन मध्ये होणारी ही सर्वात खडतर अशी ही सायकल स्पर्धा असून लंडन ते एडीनबर्ग व परत लंडन असे एकूण १५३० किमी अंतर सायकलस्वारांना १२५ तासात पार करावयाचे आहे. दर चार वर्षांनी ही स्पर्धा आयोजित केली जाते. २०१३ मध्ये भारतातून १० सायकलिस्ट नी भाग घेतला होता पैकी फक्त पटेल याने ही स्पर्धा पूर्ण केली तर २०१७ मध्ये ५३ सायकलिस्ट यांनी सहभाग घेतला त्या पैक्की फक्त १० सायकलिस्ट यांनी ही स्पर्धा पूर्ण केली. ह्या वरून ही स्पर्धा किती अवघड आहे याचा अंदाज येतो. २०२१ साली कोरोना मुळे स्पर्धा होऊ शकली नाही. ऑगस्ट २०२२ मध्ये होणाऱ्या ह्या स्पर्धेत ह्या वर्षी भारतातून १५० सायकलिस्ट ह्यात भाग घेत आहेत. अहमदनगर मधून भाग घेणारे ते पाहिले व एकमेव सायकलिस्ट आहेत.
या रेस दरम्यान सायकल स्वारांना पाऊस, वारा, थंडी व सर्वात महत्वाचे म्हणजे नेविगेशनची सर्वात मोठी अडचण असते. त्यावर मात करून स्पर्धा वेळेत पूर्ण करावयाची असते.
मागील चार वर्षापूर्वी काळे पाटील यांनी सायकलिंगचा श्री गणेशा केला व आज पर्यंत त्यांनी सात वेळा सुपर रांडोंनियर हा किताब पटकविला आहे. काळे पाटील यांनी सायकलिंग क्षेत्रात तसेच मोटार सायकलिंग मध्ये अनेक विक्रम करून अहमदनगरचे नाव देश पातळीवर पोहचविले आहे.
अंतर राष्ट्रीय स्पर्धेत भाग घ्यायचा म्हणजे आर्थिक बाजू भक्कम असायला हवी.
काळे पाटील हे सर्व सामान्य कुटुंबातील असल्या मुळे अश्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी कुणीतरी प्रायोजक मिळावा अशी अपेक्षा काळे पाटील यांनी जामखेड न्युजशी बोलताना व्यक्त केली आहे. काळे पाटील यांचा आत्मविश्वास पाहता ते ही स्पर्धा नक्की वेळेत पूर्ण करतील याची खात्री अनेकांनी दिली.