पंकजा मुंडे समर्थक आक्रमक!! प्रवीण दरेकरांच्या गाडीचा ताफा अडवला

0
211
जामखेड न्युज – – – – 
विधान परिषदेची (Vidhan Parishad) उमेदवारी नाकारल्यामुळे पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. मराठवाड्यातील विविध भागात अनेक ठिकाणी ही अस्वस्थता दिसून येत आहे. आज बीडमध्येही असाच प्रकार घडला. भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) आज बीड दौऱ्यावर असताना पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी त्यांच्या गाडीचा ताफा अडवला. पंकजा ताईंच्या नावाने हे कार्यकर्त्ते घोषणाबाजी करत होते. यामुळे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली. प्रवीण दरेकर यांनी गाडीतून उतरून या कार्यकर्त्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस देखील हजर झाले. त्यानंतर घोषणाबाजी करत हे कार्यकर्ते निघून गेले.
कुठे घडली घडना?
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे आज बीड-उस्मानाबाद दौऱ्यावर आहेत. आज सकाळच्या वेळी ते उस्मानाबादहून बीडच्या दिशेने निघाले होते. यादरम्यान पारगाव दरम्यान, दहा ते पंधरा कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. हे कार्यकर्ते पंकजाताईंसाठी घोषणा देत होते. मात्र दरेकरांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने पोलीसही तेथे दाखल झाले. मुंडे साहेब अमर है… पंकजाताई अंगार है, बाकी सह भंगार है, अशा घोषणा समर्थक देत होते. काही वेळाने प्रवीण दरेकरांचा ताफा दुसऱ्या रस्त्याने मार्गस्थ झाला.
प्रवीण दरेकरांवर राग का?
महाराष्ट्रात येत्या 20 जून रोजी विधान परिषद निवडणुकीचा आखाडा रंगणार आहे. विधान परिषदेच्या एकूण दहा सदस्यांसाठी ही निवडणूक होणार आहे. याकरिता भाजपने पाच उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. या उमेदवारीसाठी पंकजा मुंडेंना डावलून विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, उमा खापरे, राम शिंदे आणि श्रीकांत भारतीय या पाच जणांना उमेदवारी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here