Wednesday, February 11, 2026
Home ताज्या बातम्या सर्व सभासदांचे हित जोपासले जाईल – प्रा. महादेव डुचे. ...

सर्व सभासदांचे हित जोपासले जाईल – प्रा. महादेव डुचे. खुरदैठण सेवा संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलचा प्रचार शुभारंभ

0
361

जामखेड न्युज – – – –

गेल्या अनेक वर्षांपासून सेवा संस्थेचा पारदर्शक कारभार करत सभासदांचे हित जोपासले कोणत्याही सभासदांना कधीच कुठलिही अडचण येऊ दिली नाही. स्वतंत्र शेतजमीन नावावर असणाऱ्या शंभर टक्के सभासदांना कर्जवाटप केले यापुढेही कोणत्याही सभासदांच अडचण येणार नाही असे मत चेअरमन प्रा. महादेव डुचे यांनी व्यक्त केले
आज खुरदैठण सेवा सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी विकास पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ रॅली काढून व ग्रामदैवत दत्तमंदिर, मारूती मंदिर, खंडोबा मंदिर तसेच कादोबा येथे नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
   यावेळी बोलताना प्रा. महादेव डुचे म्हणाले की, आमदार रोहित पवारांच्या माध्यमातून गावाच्या सर्वागीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आमच्या चार जागा बिनविरोध आल्या आहेत आणी राहिलेल्या जागाही प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत कारण विरोधकांना पुर्ण जागेवर उमेदवार उभे करता आले नाहीत. अनेक वर्षांच्या पारदर्शक कारभारामुळे व सभासदांच्या हिताच्या निर्णयामुळे सर्व सभासद आपल्या बरोबर आहेत असा विश्वास व्यक्त केला.
   बिनविरोध निवड झालेले उमेदवार अनुसूचित जाती जमाती समुद्र दास बाबाजी, भटक्या विमुक्त जाती जमाती मध्ये मदने जयवंता रामभाऊ तर महिला राखीव मध्ये ठाकरे शितल भाऊसाहेब, डुचे सखुबाई भगवान हे चार उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत तर उरलेल्या नऊ जागांसाठी शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत
सर्वसधारण कर्जदार डुचे बाजीराव भानुदास, डुचे भिमराव श्रीराम, डुचे दिंगाबर तुकाराम, डुचे मोहन चंद्रभान, डुचे संजय बाजीराव, डुचे सुरेश मधुकर, इंगळे गहिनीनाथ रामभाऊ, सांगळे नानासाहेब चत्रभुज तर इतर मागास प्रवर्गात डुचे महादेव शिवाजी
असे शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार आहेत.
    प्रचाराचा शुभारंभ करताना भव्य रॅली काढण्यात आली होती यावेळी सरपंच ओंकार डुचे, माजी उपसरपंच बाळासाहेब आजीनाथ ठाकरे, अविनाश ठाकरे, उपसरपंच हनुमंत देवकाते, ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश डुचे, धान्य दुकानदार बाळासाहेब बाबासाहेब ठाकरे, मनोहर बाबासाहेब डुचे, विजय गहिनीनाथ डुचे, विजय भगवान डुचे, सुग्रीव ठाकरे सर, चंद्रकांत डुचे सर, मोहन डुचे सर, गोवर्धन काशिनाथ डुचे, अंकुश सांगळे दुध संघ चेअरमन, सतिष उद्धव डुचे, सतिष कल्याण डुचे, सतिष ठाकरे मेजर, विक्रम बलभीम डुचे, नितीन सर्जेराव डुचे, गणेश श्रीहरी डुचे, भाऊसाहेब सांगळे, दादासाहेब रामकिसन डुचे, सुभाष डुचे, राम सांगळे, संजय ठाकरे, दिपक सांगळे, गौतम सांगळे, पांडुरंग नाथा डुचे, सुरज डुचे, सचिन डुचे सर, अक्षय ठाकरे, कांतीलाल ठाकरे, दत्तात्रय उद्धव डुचे, अमोल डुचे, हरिदास विनायक डुचे, अर्जुन श्रीरंग डुचे, अविनाश डुचे, कृष्णा कैलास डुचे, प्रकाश समिंदर माजी ग्रामपंचायत सदस्य, रावसाहेब घोगरदरे, लक्ष्मण घोगरदरे, दिलीप घोगरदरे,श्रीराम डुचे, मारूती डुचे, भाऊ ठाकरे, राम फिटर, दत्तात्रय वाकळे, कांतु डुचे, लक्ष्मण वाकळे यांच्या सह सर्व सभासद व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!