जामखेड न्युज – – –
आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आ. रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातील पाण्याची असलेली अडचण सोडवण्यासाठी विशेष लक्ष घातले तसेच ही अडचण कायमची सोडवण्यासाठी ते वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असतानाही वेळोवेळी पाहायला मिळाले. याचेच फलितरूप म्हणून कर्जत व जामखेड तालुक्यातील एकूण 40 गावांना जलजीवन मिशन योजनेंतर्गत 42.48 कोटी रुपयांचा निधी शासनातर्फे मंजूर करण्यात आला आहे. यासाठी शासन दरबारी आमदार रोहित पवार यांनी वेळोवेळी सातत्याने पाठपुरावा करत हा मुद्दा शासनाकडे लावून धरला होता.
मान्यता मिळालेल्या गावांमध्ये कर्जत तालुक्यातील 19 तर जामखेड तालुक्यातील 21 अशा एकूण 40 गावांचा समावेश करण्यात आला आहे. मतदारसंघातील महिलांच्या डोक्यावरील हंडा खाली उतरवण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करू आणि पाण्याचा प्रश्न मार्गी लावू, असा शब्द आमदार रोहित पवार यांनी दिला होता. आता तो शब्द खरा होत असताना पाहायला मिळत आहे.
संबंधित गावांचे प्रस्ताव दरडोई खर्च कमी असल्याने जिल्हा स्तरावर मंजुरीसाठी होते. परंतु, सोलारचा योजनेतील समावेश व डीएसआर किमतीतील बदल या सर्व गोष्टींमुळे जिल्हा स्तरावर मंजुरीसाठी असणारे हे प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आले. तसेच त्याच्या मंजुरीसाठी आमदार रोहित पवार यांनी वेळोवेळी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले. यासोबतच अतिरिक्त वाड्या, वस्त्या व गावे देखील जलजीवन मिशनमध्ये समाविष्ट होण्यासाठी आमदार रोहितदादांनी स्वतः वैयक्तिक पातळीवर लक्ष घातलं होतं. अखेर त्यांच्या प्रयत्नातून मतदारसंघातील पाण्याची असलेली गंभीर अडचण दूर होत असल्याचं या माध्यमातून दिसून येत आहे.
यासह दरडोई खर्च कमी असणारे राज्यातील काही प्रस्ताव जिल्हा स्तरावर मंजूर झाले असून त्याच्या निविदाही प्रसिद्ध झाल्या आहेत. ते कामही लवकरच पूर्ण होतील. तसेच सोलारचा या योजनेत समावेश केल्याने आता त्याला अधिकचे बळ देखील मिळणार आहे. भूजल सर्वेक्षण यंत्रणेने पाण्याचे स्त्रोत ओळखून प्रमाणित केल्यामुळे या योजनांना मुबलक पाणी मिळणार असून या योजना सातत्याने कार्यक्षम राहतील यात शंका नाही.
*समाविष्ट गावांची तालुकानिहाय यादी*
*कर्जत तालुका*
१. निंबे
२. शिंपोरा
३. होलेवाडी
४. म्हाळगी
५. रातंजन
६. शेगुद
७. वडगाव तनपुरा
८. औटेवाडी
९. कुंभेफळ
१०. खंडाळे
११. निंबोडी
१२. कोलवडी
१३. तिखी
१४. बिटकेवाडी
१५. दिघी
१६. लोणी मसादपुर
१७. तोरकवाडी
१८. खातगाव
१९. कांगुडवाडी
*जामखेड तालुका*
१. बावी
२. महारूळी ( गुरेवाडी)
३. गुरेवाडी
४. पारेवाडी (आरणगाव)
५. राजेवाडी
६. आनंदवाडी
७. धानोरे
८. सातेफळ
९. धोंडपारगाव
१०. चोंभेवाडी
११. पिंपळगाव आळवा
१२. खुटेवाडी- मुंजेवाडी
१३. बोर्ले
१४. घोडेगाव
१५. भवरवाडी
१६. खामगाव
१७. सांगवी
१८. झिक्री
१९. आघी
२०. खुरदैठण
२१. तरडगाव