जामखेड न्युज – – – – –
कोल्हापूर प्रतिनिधी
नॅशनल असोसिएशन ऑफ स्टुडंट्स् ऑफ आर्किटेक्चर ( नासा ) च्या अंतर्गत दरवर्षी होणाऱ्या स्पर्धांची 2020-21 आणि 2021-22 ही 63 व 64 वी दोन वर्षे श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डींग हाऊसच्या आर्किटेक्चर महाविद्यालयासाठी महत्त्वाची ठरली. या स्पर्धेत सलग दोन वर्षे राष्ट्रीय स्तरावर प्रथम पारितोषिक जिंकत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे त्यामुळे महाविद्यालयावर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.
आर्किटेक्चर च्या विविध विषयांशी निगडित नानाविध स्पर्धा आणि उपक्रम नासा राबवत असते. या स्पर्धांमध्ये भारतातील जवळपास 350 महाविद्यालयांतील आर्किटेक्चर चे विद्यार्थी सहभाग नोंदवतात. सदर वर्षी ‘ इन्फिल आर्किटेक्चर ‘ या विषयावर ‘ लुई काह्नन ट्रॉफी ‘ ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचा निकाल ‘ ख्राइस्ट युनिव्हर्सिटी, केंगेरी, बंगलोर ‘ येथे 4 जून 2022 रोजी जाहीर करण्यात आला. कोल्हापूरच्या श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डींग हाऊसच्या वास्तुनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर प्रथम पारितोषिक ( साईटेशन ) पटकावले. तसेच मागील वर्षी ‘ लॉरी बेकर ट्रॉफी ‘ मध्येही महाविद्यालयाला प्रथम पारितोषिक मिळाले होते.
लुई काह्नन ट्रॉफी ( एलआयके ) च्या विजयी गटामध्ये तृतीय वर्षातील समृद्धी शितोळे, कौस्तुभ सुतार, मंदिरा जांभळे, शुभम धोतमल, श्रेया कुंभार, अभिजित तेली, गायत्री डोंगरे, मनाली कुलकर्णी, पार्थ पाटणकर, पूजा कांबळी आणि सर्वेश पाटील, तर द्वितीय वर्षातील कृष्णा लिंबाणी, समृद्धी गोटे, ऐश्वर्या पाटील, भार्गवी कुलकर्णी, तन्मय पुजारी, प्रथम पाटील, अध्वर्यू कुंभार, भाऊ चव्हाण, निकिता कुराडे, श्रुती वराट, समृद्धी आरेकर आणी संस्कृती जाधव अशा 24 विद्यार्थ्यांचा समावेश होता. या साठी प्राध्यापक अमर भोसले, वंदना पुसाळकर आणि सतीश मिराशी यांनी विशेष परिश्रम घेतले. कॉलेज चे प्राचार्य संदिप दिगे, संस्थेचे चेअरमन श्री के जी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
महाविद्यालयाने राष्ट्रीय स्तरावर पारितोषिक मिळवल्यामुळे अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.