कार्पोरेट जगाकडे पाठ फिरवून गरिबांच्या सेवेसाठी मातृभुमीतच डॉ. प्रविण मिसाळ यांनी सुरू केली दंतसेवा

0
335

जामखेड न्युज – – – –

जिद्द चिकाटी असेल तर शुन्यातून विश्व निर्माण करता येते. सेवाभावी वृत्ती, परिसरात मोफत दंत तपासणी शिबिरे आयोजित करून लोकांना दाताच्या आरोग्यविषयी माहिती देत क्लिनिकमध्ये उच्च प्रतीच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत त्यामुळे डॉ. प्रविण मिसाळ यांनी डेंटिस्ट म्हणून परिसरात मोठे नाव कमावले आहे.
   डॉ. प्रविण मिसाळ यांनी पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण जामखेड मधील नागेश विद्यालयात घेतले दहावीच्या परीक्षेत द्वितीय क्रमांक तर बारावी नंतर सीईटी ला तृतीय क्रमांक मिळविला यानंतर दंत वैद्यकीय पदवी शिक्षण शासकीय दंत महाविद्यालय सेंट जाॅर्ज व्हाॅस्पिटल मुंबई येथे घेतले. यानंतर ससून रुग्णालयात निवासी डॉक्टर म्हणून एक वर्ष सेवा केली २००९ मध्ये जामखेड येथे बीड रोडवर एका लहान गळ्यात आपली सेवा सुरू केली. त्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. सर्व सुविधांनी युक्त डॉ. मिसाळ डेन्टल केअर अँड ओ पी जी एक्सरे सेंटर उभारले आहे. डॉ. प्रविण मिसाळ व डॉ. वैशाली मिसाळ दोघेही सेवा देत आहेत.
   डॉ. प्रविण मिसाळ यांचा भाऊ रविंद्र अशोक मिसाळ यांची २०१९ साली न्यायाधीश पदावर नियुक्ती झाली आहे. सध्या ते बुलढाणा जिल्ह्य़ातील नांदुरा येथे आहेत. त्यांची पत्नी क्रांती रविंद्र मिसाळ या पीएसआय आहेत. 
   डॉ. मिसाळ डेंटल केअर मध्ये उपलब्ध सुविधा 
डॉ. प्रविण मिसाळ हे गेली तेरा वर्षे दाताच्या समस्यांसाठी सेवा देताना सुसज्ज हाॅस्पिटलच्या माध्यमातून अ‍ॅडव्हान्स रूट कॅनाल, आर्थोडोटीक ट्रिटमेंट व डेंटल इम्प्लान्ट रूग्णांच्या सेवेसाठी सतत प्रयत्नशील असतात. 
पक्के कृत्रिम दंतरोपण
स्क्रूच्या साहाय्याने पक्के दात बसवणे (डेंटल इम्प्लांन्ट) 
 दातांना तार बसवून दात सरळ करणे व दातांमधील गॅप बंद करणे
काॅस्मेटीक डेंटिस्ट्री अॅड स्माईल डिझाईनिंग
ओपीजी एक्सरे
आत्याधुनि ओपीजी एक्सरे मशिन
जबड्याचे फ्रॅक्चर काढणे, गाठी काढणे, कॅन्सर निदान दात स्वच्छ करणे, दंत व्यंगोपचार दातांना तार बसवून दात सरळ करणे व दातांमधील गॅप बंद करणे. 
     डॉ. प्रविण मिसाळ यांचे सामाजिक कार्ये 
डॉ. मिसाळ यांनी समाजसेवेचे वृत्त अंगी बाणवले आहे. दरवर्षी शाळेत दंत आरोग्यविषयक शिबीरे आयोजित करून शालेय विद्यार्थ्यांना दाताच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन करतात तसेच भरतीपुर्व प्रशिक्षण देणार्‍या शिवनेरी स्वप्नपूर्ती करिअर ॲकॅडमीमध्ये शिबीर आयोजित करून भावी सैनिकांना दाताच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन करतात. 
   डॉ. मिसाळ यांचे सर्टिफिकेट स्पेशल कोर्स
कृत्रिम दंतरोपन( डेंटल इम्प्लान्ट
दंतव्यंगोपचार पद्धती 
हिरड्यांच्या सर्जरी
काॅस्मेटीक दंत उपचार (दंत सौंदर्य)
  चांगल्या दातांच्या आरोग्यासाठी डॉ. प्रविण मिसाळ यांचे लोकांना आवाहन
व्यसनमुक्त राहणे – तंबाखू, सिगारेट, मावा यापासून दूर राहणे,
दाताची स्वच्छता – ब्रश, माउथ वाॅश, डेंटल फ्लॅश नियमित वापरणे,
ब्रश तीन महिन्याला बदलणे
प्रत्येक जेवणानंतर चुळ भरणे
वेडेवाकडे दात सरळ करणे, यामुळे दात स्वच्छ करणे सोपे जाते
दात नसल्यास दात बसवून घेणे यामुळे बाकी दातांचे आरोग्य चांगले राहते 
किडलेल्या दातावर त्वरीत उपचार करणे दुसरे दात किडत नाहित 
नियमितपणे सहा महिन्यातून एकदा दाताच्या डॉक्टर कडून तपासणी करून घेणे 
अशा प्रकारे काळजी घेतली तर आपल्या दातांचे सौंदर्य अधिक चांगले दिसते असे डॉ. प्रविण मिसाळ यांनी सांगितले 
   दातांच्या समस्यांसाठी 
डॉ. मिसाळ डेंटल केअर अँड ओ पी जी एक्स रे सेंटर
पंचरत्न हाॅटेल समोर, नवीन बस स्टँड शेजारी, स्टेट बँकेजवळ, नगर रोड जामखेड जि. अहमदनगर मो. नंबर 8180878854  /.     9273704074
    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here