जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त जामखेड शहरात सामाजिक कार्यकर्ते रमेश (दादा) आजबे यांच्यातर्फे “आमदार चषक” ( जामखेड प्रीमियर लीग ) भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यातील पहिली मॅच जायभायवाडी विरुद्ध जामखेड पोलिस स्टेशन यामध्ये झाली यात जायभायवाडी संघाने पहिली मॅच जिंकली मॅन ऑफ द मॅच जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या हस्ते देण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते रमेश (दादा) आजबे यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत प्रथम क्रमांकाच्या संघास एक लाख रुपये, द्वितीय क्रमांकास पंच्याहत्तर हजार रुपये, तृतीय क्रमांकास, एक्कावन्न हजार रुपये तर चौथ्या क्रमांकाच्या संघास एकतीस हजार रुपये आहे. मॅन ऑफ द सिरीज एक सायकल आहे. मॅन ऑफ दि मॅच फायनल दोन हजार एक रूपये, उत्कृष्ट गोलंदाज दोन हजार एक रूपये, उत्कृष्ट फलंदाज दोन हजार एक रूपये, उत्कृष्ट संघास पाच हजार एक रूपये बक्षिस ठेवण्यात आले होते.