जामखेड न्युज – – – –
जामखेड येथील समृद्धी नागरी सहकारी पतसंस्था जामखेड च्या तज्ञ संचालक पदी भानुदास रोडे यांच्या निवडीचे पत्र समृद्धी नागरी पतसंस्था जामखेडच्या अध्यक्षा सौ. आरती दीपक देवमाने यांनी दिले आहे.
यावेळी जवळा गावचे सरपंच प्रशांत शिंदे, जेष्ठ नेते विष्णू हजारे गुरुजी, जेष्ठ नेते दशरथ कोल्हे, राष्ट्रवादीचे युवा नेते राहुल पाटील, सावता ग्रुप चे अध्यक्ष प्रमोद कोल्हे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र राऊत, भाजपचे हबीब शेख, बजरंग डूचे, नितीन मते, प्रसिद्ध व्यापारी शिवानंद कथले, डॉ ईश्वर हजारे, जाफर शेख, मुक्तार शेख, विश्वजित हजारे, पत्रकार संदेश हजारे, अशोक रोडे, नाना कोल्हे, दीपक देवमाने, शंकर ढगे, गणेश देवमाने, वैभव खोले, सचिन देवमाने, सह आदी मित्र परिवार उपस्थित होता.
अध्यक्षा आरती देवमाने म्हणाल्या कि, भानुदास रोडे सर सहकारातील क्षेत्रातील मोठा अनुभव असून जवळा सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष राहिले आहेत. त्यामुळे भानुदास रोडे सर यांच्या अनुभवाचा फायदा समृद्धी नागरी सहकारी पतसंस्थेला निश्चित होणार आहे. तसेच भानुदास रोडे सर यांनी मोठ्या मनाने तज्ञ संचालक पद स्वीकारल्याने संस्थेच्या वतीने आभार मानले.
यावेळी भानुदास रोडे सर बोलताना म्हणाले कि, मी कुठलीही अपेक्षा न ठेवता आत्ता पर्यंत सहकार क्षेत्रात काम केले आहे. जवळ विकास सेवा सोसायटी अध्यक्ष व इतर संस्थेमध्ये संचालक म्हणून काम करत आलो आहे. कायम संस्थेच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे समृद्धी नागरी सहकारी पतसंस्था हि माजी संस्था असल्याने मी पूर्ण सहकार्य करणार असल्याचे भानुदास रोडे सर यांनी सांगितले. यावेळी समृद्धी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मान्यवर उपस्थित होते.
भानुदास रोडे यांच्या अनुभवाचा पतसंस्थेला नक्कीच फायदा – सरपंच प्रशांत शिंदे
दोन महिन्यापूर्वी समृद्धी नागरी सहकारी पतसंस्थेची सुरुवात झाली असून या जवळा गावासाठी हि संस्था महत्वाची भूमिका बजावणार आहे. त्यासाठी तज्ञ मार्गदर्शकाची गरज असते म्हणून भानुदास रोडे सर यांच्या अनुभवाचा समृद्धी नागरी सहकारी पतसंस्थेला नक्कीच फायदा होणार असल्याचा ठाम विश्वास सरपंच प्रशांत शिंदे यांनी व्यक्त केला.
यावेळी जेष्ठ नेते विष्णू हजारे गुरुजी, राजेंद्र राऊत, मुक्तार शेख, आदींनी मनोगत व्यक्त केले.