मान्सून कुठे गायब झाला? शेतकरी वर्गात चिंता राज्यात पावसाऐवजी उष्णतेची लाट

0
199
जामखेड प्रतिनिधी 
            जामखेड न्युज – – – 
 मोसमी वाऱ्यांना महाराष्ट्र प्रवेशास अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे मान्सून येता येता थांबला आहे. (Weather update) दरम्यान, राज्यात पावसाऐवजी उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. विदर्भात उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भात 2 दिवस उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. (Heat wave)
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या राज्यातील बहुतांश नागरिकांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. र्नैऋत्य मोसमी पावसाच्या अरबी समुद्रातील शाखेच्या प्रवासास पोषक वातावरण नसल्याने त्याच्या महाराष्ट्रातील प्रवेशास अडथळा निर्माण झाला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून मोसमी पाऊस कर्नाटकच्या कारवापर्यंत येऊन थबकलाय. मोसमी पावसाच्या बंगालच्या उपसागरातील शाखा मात्र वेगानं प्रगती करतायत. शुक्रवारी या भागात पूर्वोत्तर राज्यांमध्ये प्रवेश करून पावसाने थेट हिमालयाच्या पायथ्यापर्यंत मजल मारली.
उत्तरेकडून येणाऱ्या कोरडया, उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भासह उत्तर भारतात अनेक ठिकाणी सध्या उष्णतेची लाट असून, ती आणखी दोन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here