जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – – (सुदाम वराट)
जामखेड शहरातील मुंजाबा गल्ली व लक्ष्मी चौकात संजय काशिद मित्रमंडळाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त शिवजन्म सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणावर महिला उपस्थित होत्या. यावेळी महिलांनी बाळ शिवाजी विषयी पाळणे गायले त्यामुळे वातावरण शिवशाही अवतरल्या सारखे वाटत होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या विचारांचे अनुकरण केल्यास आपले जीवन समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही असे रोहिणी काशिद यांची सांगितले.

शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद मित्रमंडळाच्या वतीने मुंजाबा गल्ली व लक्ष्मी चौकात प्रभाग क्रमांक 18 व प्रभाग 14 मध्ये शिवजयंतीनिमित्त शिवजन्म सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी
रोहिणी काशीद, राणी जावळे, ऋषाली रासकर, मीना बेलेकर, गीता येवले, अर्चना पवार शारदा मेत्रे, संगीता मेत्रे, कांचना दाहितोडे, रविना गुळवे, शितल बोगाडे, प्रतिभा रासकर, उज्वला जावळे, अनिता नवगिरे, आदी महिला उपस्थित होत्या.
शिवसेनेच्या वतीने नेहमीच अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत असतात. 80% समाजकारण व 20 % राजकारण या तत्त्वावर शिवसेना काम करत आहे.
वेगवेगळ्या प्रभागात तालुकाप्रमुख संजय काशिद यांनी कोरोना काळात लोकांना किराणा किट, भाजीपाला व अर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे मोफत वाटप करून जनतेला मोठा आधार देण्याचे काम केले होते. तसेच प्रभागातील अडीअडचणी सोडविण्यासाठी काशिद हे नेहमीच अग्रेसर असतात. त्यामुळे शहरातील लोकांना शिवसेना आपलीशी वाटते. शिवजयंतीनिमित्त शिवजन्म सोहळ्यामुळे परिसरात शिवशाही अवतरल्या सारखे वातावरण निर्माण झाले होते.