कोणतीही आपत्ती आली की शरद पवार आठवतात – दत्तात्रय भरणे. पुढील वर्षीपासून अहिल्यादेवी होळकरांच्या शासकीय जयंतीसाठी पंचवीस लाख रुपयांचा निधी देण्यात येईल – पालकमंत्री हसन मुश्रीफ

0
195

जामखेड प्रतिनिधी

            जामखेड न्युज – – – 
कोणतीही आपत्ती आली कि शरद पवार आठवतात समाजाचे अनेक प्रलंबित प्रश्न शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली फक्त महाविकास आघाडी सरकार सोडू शकते. काही लोक खालच्या पातळीवर जाऊन चिखलफेक करतात त्यांना जनतेने ओळखले आहे असे मत सार्वजनिक बांधकाम मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अहिल्यादेवी होळकरांच्या २९७ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात व्यक्त केले.
अहिल्यादेवी होळकर यांच्या चौंडी गावी सार्वजनिक जयंती साजरी करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार, ग्रामविकासमंत्री व नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, सार्वजनिक बांधकाममंत्री व सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, युवानेते रोहित पाटील, आमदार रोहित पवार, माजी मंत्री आण्णा डांगे, राजेंद्र दळवी, राजेंद्र फाळके, बाळासाहेब साळुंके, भुषणसिंह राजे होळकर, अक्षय शिंदे, लोकनेते आमदार निलेश लंके, आमदार बाळासाहेब आजबे, माजी आमदार रामहरी रूपनर, सक्षणा सलगर, अनिल गोटे, उत्तमराव जानकर, नारायण पाटील, आमदार संग्राम जगताप यांच्या सह अनेक मान्यवर मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
     यावेळी बोलताना मंत्री भरणे म्हणाले की, धनगर समाजाला तेरा योजणेचा लाभ मिळावा, बिरोबाच्या मंदिराचे काम सुरू होत आहे. तसेच घरकुल योजनेसाठी समाजबांधवांनी प्रस्ताव द्यावेत रोजगार निर्मिती साठी भविष्यात काही योजना आणणार  असल्याचे सांगितले
वाफगाव किल्ला जागा संस्थेच्या ताब्यात द्यावी
आरक्षण मागत असताना अनेक युवकांवर खोटे गुन्हे दाखल झालेत ते मागे घ्यावेत.अशीही मागणी केली
  यावेळी बोलताना भरणे म्हणाले की, काही लोक
शिट्ट्या टाळ्या व मिडिया समोर येऊन हुल्लडबाजी करतात आता जनतेने त्यांना ओळखले आहे. फक्त पवार साहेबच धनगर समाजाचे प्रश्न सोडवू शकतात.
     यावेळी बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की,
यापुढे अहिल्यादेवी जयंती ही शासकीय होईल जिल्हा नियोजनातून जयंतीला दरवर्षी पंचवीस लाख रुपये दिले जातील तसेच अहिल्यादेवींचे कार्य खुपच महान आहे त्याच्या म्युझियम साठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात येईल आणी धनगर समाजाच्य
 वाडी वस्तीवर रस्ते करण्याचे आश्वासन दिले.
    यावेळी धनंजय मुंडे, अनिल गोटे, आण्णासाहेब डांगे, भुषणसिंह होळकर यांनी अहिल्यादेवींच्या कार्याची महती सांगितली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here