जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
अहिल्यादेवींचे कार्य खुपच महान आहे. पुण्यश्लोक ही पदवी फक्त अहिल्यादेवींनाच आहे. त्यांचे विचार पुढच्या पिढीला समजावेत म्हणून जयंती उत्सव साजरा करण्यात येतो. अहिल्यादेवींचे सामाजिक व धार्मिक कार्य खुपच महान आहे शेकडो मंदिराचा जीर्णोद्धार तसेच नदीवर घाट बांधले यातुन दुष्काळ निवारण तसेच रोजगार निर्मितीही उपलब्ध करून दिली असे मत आमदार रोहित पवारांनी अहिल्यादेवींच्या २९७ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.
अहिल्यादेवी होळकर यांच्या चौंडी गावी सार्वजनिक जयंती साजरी करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार, ग्रामविकासमंत्री व नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, सार्वजनिक बांधकाममंत्री व सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, युवानेते रोहित पाटील, आमदार रोहित पवार, माजी मंत्री आण्णा डांगे, राजेंद्र दळवी, राजेंद्र फाळके, बाळासाहेब साळुंके, भुषणसिंह राजे होळकर, अक्षय शिंदे, लोकनेते आमदार निलेश लंके, आमदार बाळासाहेब आजबे, माजी आमदार रामहरी रूपनर, सक्षणा सलगर, अनिल गोटे, उत्तमराव जानकर, नारायण पाटील, आमदार संग्राम जगताप यांच्या सह अनेक मान्यवर मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार रोहित पवारांनी सांगितले की, या जयंतीचा आयोजक मी नाही आपण सर्व जण आहात सर्वाच्या पुढाकाराने ही जयंती साजरी होत आहे.
चौंडीत लवकरच साडेपाच कोटीचा घाट व अहिल्यादेवींच्या विचारांचे एक सुंदर म्युझियम बनवले जाणार आहे.
या पवित्र भागाचा लोकप्रतिनिधी होण्याची संधी मला मिळाली यामुळे मी भाग्यवान आहे. तसेच येथुन पुढे दरवर्षी जयंती साजरी करण्यासाठी प्रशासनाने निधी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती केली
यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, माझी आई सुनंदाताई पवार अहिल्यादेवी व जिजाऊ यांच्या कार्याचा वारसा घेऊन कामकाज करत आहेत. आणी योगायोग म्हणजे आजच सुनंदाताई पवार यांचाही जन्मदिवस आहे.
अहिल्यादेवी होळकरांच्या शौर्याची गाथा चित्रफितीद्वारे सादर केली
तसेच पारंपरिक पद्धतीने शरदचंद्रजी पवार यांचा सन्मान करण्यात आला घोंगडी व काठी देऊन
अहिल्यादेवी होळकरांच्या शौर्याची गाथा चित्रफितीद्वारे सादर केली
पारंपरिक पद्धतीने शरदचंद्रजी पवार यांचा सन्मान करण्यात आला घोंगडी व काठी देऊन
पाचशे नेत्यांसाठी भव्य दिव्य व्यासपीठ उभारले होते. मोठय़ा प्रमाणावर नेते हजर होते.