जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
आम्ही सैनिक घडवतो हे ब्रीद घेऊन जामखेड येथे सुरू झालेल्या शिवनेरी स्वप्नपूर्ती करिअर ॲकॅडमीस ८ वर्षे झाली. या निमित्ताने ८ वा वर्धापन दिन आपल्या सर्वांच्या सहकार्याने बुधवार दि. १ जून २०२२ रोजी ठिक सकाळी ६.४५ वाजता हा कार्यक्रम होणार असून यावेळी होणाऱ्या १६०० मीटरच्या या स्पर्धेसाठी प्रथम बक्षिस २५५१, व्दितीय बक्षिस, १५५१ तर तृतीय बक्षिस १०५१ असणार आहे. तर मुलींमध्ये जी स्पर्धक ८०० मीटर अंतर तसेच जी मुलगी २.५० मिनिटाच्या अगोदर पुर्ण करेन तिलाही १०५१रुपयांचे बक्षिस दिले जाणार आहे. या स्पर्धेसाठी १०० रूपये इतकी नाममात्र प्रवेश फी ठेवण्यात आली आहे.
तरी सर्व विद्यार्थी , विद्यार्थीनी सर्वांना अवाहन करण्यात येते की स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शोभा वाढवावी. ( या स्पर्धेत अकॅडमीशिवाय बाहेरील विद्यार्थीही सहभाग घेऊ शकतात. )
या कार्यक्रमासाठी जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे, पोलीस निरीक्षक . संभाजी गायकवाड जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते आदी मान्यवर तसेच जामखेड महाविद्यालय येथून सेवा निवृत्त झालेले क्रिडा संचालक व राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत – जामखेड विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रा. मधुकर राळेभात व रामचंद्र घुले, तसेच महाराष्ट्र पोलिस दलातील बहादुर विद्यार्थीनी सौ . डुचे विठाबाई ( पिंपरी चिंचवड), कु. क्षिरसागर शितल (पिंपरी चिंचवड), कु . कदम त्रिवेनी ( मुंबई पोलिस) यांचा यशस्वीतेसाठी गौरव सोहळा अश्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी उद्योजक रमेशशेठ गुगळे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, कोठारी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी तसेच जामखेड पंचक्रोशितील सर्व पक्षाचे पदाधिकारी , कार्यकर्ते , सामाजीक क्षेत्रातील मान्यवर . आजी – माजी सैनिक यांच्या उपस्थित राहणार आहेत.
जामखेड येथिल शिवनेरी अॅकॅडमीच्या माध्यमातुन गेली ८ वर्षे सैनिक, महा. पोलीस व इतर सर्वच दलासाठी बहादूर देशसेवक तयार करण्याचे काम केले जात आहे. प्रत्येक घरा – घरात तुलसी प्रमाणे दारा दारात सैनिक घडवन्याचे काम हे आमचे स्वप्न आहे . आतापर्यंत अॅकॅडमीतून भारतीय सैन्यदल (आर्मी)१४०, महाराष्ट्र पोलीस मुले ६ व मुली ५ भरती झालेल्या आहे, ही जामखेडकरांसाठी गौरवाची गोष्ट आहे.
जामखेड शहरालगत बीड रोडवर शिवनेरी ॲकॅडमी , या ठिकाणी होणाऱ्या या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थिती राहण्याचे आवाहन संचालक सेवा निवृत्त कॅप्टन लक्ष्मण भोरे (9158006663, 9158609750) यांनी केले आहे.