सारोळा सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी मकरंद काशिद तर उपाध्यक्षपदी दत्ता बहिर यांची बिनविरोध निवड

0
217
जामखेड प्रतिनिधी 
             जामखेड न्युज – – – – 
जामखेड तालुक्यातील सारोळा विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी मकरंद काशीद तर उपाध्यक्षपदी दत्ता बहीर यांची बिनविरोध निवड झाली आहे. सारोळा सेवा संस्थेची निवडणूक यापूर्वीच बिनविरोध झाली असून मागील ३५ वर्षापासूनची परंपरा पै. युवराजभाऊ काशिद व सरपंच अजय काशीद यांच्या नेतृत्वाखाली कायम राहिली आहे.

                             ADVERTISEMENT

       जामखेड येथील सहायक निबंधक कार्यालयात सारोळा सेवा संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची कार्यक्रम सहाय्यक निबंधक देवीदास घोडेचोर यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी अध्यक्ष पदासाठी मकरंद काशीद व उपाध्यक्ष पदासाठी दत्ता बहीर यांचे एकमेव उमेदवारी अर्ज वेळेत दाखल झाले. दोन्ही अर्ज वैध ठरल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अध्यक्ष मकरंद काशीद व उपाध्यक्षपदी दत्ता बहीर यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
        सारोळा गावातील नव्या जुन्याचा मेळ घालून मराठा गौरव युवराज भाऊ काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली सारोळा सोसायट बिनविरोध करण्यात आली होती. सारोळा सोसायटी पदाधिकारी निवड बिनविरोध झाल्यानंतर सारोळा सरपंच अजय काशीद, रामदास मुळे, हिंदुराज मुळे, किरण मुळे, अंगद सांगळे, राजेंद्र मासाळ, अरविंद मुळे, हर्षद मुळे, आप्पासाहेब ढगे  शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशीद, सिद्धेश्वर पवार, पोलीस पाटील देविदास पवार, गोकुळ काशीद, अशोक मुळे, गोवर्धन डोळसे अरविंद मुळे, हनु मुळे, बापू तांबे, राजू मासाळ, हर्षद मुळे, शहाजी पवार हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here