जामखेड न्युज – – –
दि. ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जयंती निमीत्त चौंडी ता . जामखेड येथे दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती, कर्जत जामखेडचे कार्यकुशल आमदार आ.रोहित पवार यांचे माध्यमातून चौंडी येथे विविध कार्यक्रम व भव्य अशा कार्यक्रमांचे व जनसभेचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी राज्यभरातून महत्त्वाच्या व्यक्ती व मान्यवर येणार असून चोंडी येथे येणाऱ्या लोकांची गर्दी तसेच वाहनांची संख्याही लक्षनय असणार आहे.
ADVERTISEMENT
त्यामुळे वाहतुकीची कोंडी होवून कोणत्याही प्रकारच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये तसेच भाविक व सभेसाठी गैरसोय होवू नये याकरिता वाहतुकीचे नियमन करणे आवश्यक आहे. यामुळे पोलीसांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे मुंबई पोलीस अधिनियम १ ९ ५१ चे कलम ३३ ( १ ) ( ब ) नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन दि . ३१/०५/२०२२ रोजी सकाळी ०६.०० वा.पासुन ते दुपारी १६.०० वाजेपावेतो अहमदनगर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील याचे आदेशानुसार चोंडीकडे येणाऱ्या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतुक खालील मार्गाने वळविणेबाबतचा आदेश जारी करीत आहे .
१ ) हाळगाव पिंपरखेड – गिरवली ता जामखेड मलठण ता. कर्जत मार्गे कर्जत निमगाव डाकु चापडगाव
२ ) पिंपरखेड गिरवली ता . जामखेड – मलठण ता . कर्जत मार्गे निमगाव डाकु चापडगाव ता कर्जत –
३ ) गिरवली ता . जामखेड मलठण ता . कर्जत मार्गे निमगाव डाकु चापडगाव ता. कर्जत .
४ ) चापडगाव ता . कर्जत – निमगाव डाकु मलठण ता कर्जत गिरवली ता. जामखेड
अशा प्रकारे वाहतूक वळविण्यात आली आहे
अशी माहिती जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी दिली आहे.