ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे आदर्श ग्राम योजनेत कोल्हेवाडी गावाने मारली बाजी

0
268
जामखेड न्युज – – – – 
आर .आर. आबा स्मार्ट ग्राम स्पर्धेत भाग घेत कोल्हेवाडी ( ता. नगर ) गावाने नगर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला . तसेच संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानातही या गावाने बाजी मारली आहे .आदर्श ग्राम योजनेचे १० लाखांचे तर संत गाडगेबाबा राज्यस्तरीय समितीने उत्तेजनांर्थ ५० हजारांचे बक्षीस जाहिर केल्याचे पत्र मिळाले असल्याची माहिती सरपंच मनिषा कुटे यांनी दिली.
               Advertisement           
    नगर तालुक्यातील कोल्हेवाडी ग्रामपंचायतीत सत्तांतर घडवून आणत सरपंच मनिषा कुटे , उपसरपंच पोपटराव शेळके यांनी प्रथम गावचा चेहरामोहरा बदलण्याचे काम हाती घेतले .विकासाबाबत मागास असलेल्या या गावाला विकास प्रक्रियेत आणले गेले . कोणत्याही राजकीय पक्षाचा शिक्का न लावता या गावाने विकासाची वाट धरली .विकास कामासाठी मिळणाऱ्या शासकीय निधी बरोबरच लोकवर्गणीच्या माध्यमातून विकासकामे करत गावचे रुप पालटले .
     गावचे दिमाखदार प्रवेशद्वार, अंगणवाडीचे सुशोभिकरण, गावात एलईडी दिवे बसवून विजेचा लखलखाट केला.भग्नावस्थेत असलेल्या समाज मंदीरांची दुरुस्ती, गावातील चौकांत पेव्हिंग ब्लॉक बसवून चौकांची केलेली सजावट, पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन, सांडपाण्याचे योग्य नियोजन करत, लोकवर्गणीतून ९० वर्षापासून पडीक असलेल्या एक एकर क्षेत्रावर खेळासाठी मैदान तयार केले.याबरोबरच गावात कार्पोरेट ग्रामसंसद कार्यालय, गावात एक घर एक झाड योजना राबवत विकासकामाबरोबरच गावची स्वतंत्र वेबसाईट बनविण्यात आली.कोल्हेवाडी गावाने आदर्श ग्राम स्पर्धेत भाग घेतला.
    राज्य शासनाच्या वतीने गावची पाहणी करण्यासाठी पारनेरचे गटविकास अधिकारी माने , विस्तार अधिकारी, आरोग्य अधिकारी यांची टीम आली होती .तसेच अशोक कड़ूस, शिक्षण अधिकारी अहमदनगर, राहुरीचे विस्तार अधिकारीही आले होते.  गावात संत गाडगे बाबा राज्यस्तरीय समितिच्या अधिकाऱ्यांनी  पाहणी करुन गावात स्वच्छतेबाबत केलेल्या उपाययोजनेला दाद दिली . या समितीच्या वतीने कोल्हेवाडी गावाला उत्तेजनार्थ ५० हजार रूपयांचे पारितोषक समितीच्या वतीने जाहिर केले . कोल्हेवाडी गावाने आदर्श ग्राम योजनेत तालुक्यात प्रथम क्रमांकाने बाजी मारल्याने गावाचा विकास पाहण्यासाठी अधिकारी तसेच पाहुण्यांची मांदियाळी वाढली आहे . नगर जिल्हा सह दिवानी न्यायाधिश जे . के . नंदनवार यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले.
   पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी रेश्मा होजगे , विस्तार अधिकारी खाडे ,  ग्रामसेवक शेळके , नगर तालुक़ा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप , यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.कोल्हेवाडीला आदर्श गाव बनविण्यासाठी सरपंच मनिषा कुटे , उपसरपंच पोपटराव शेळके , ग्रा.पं. सदस्य दादासाहेब जाधव , संगीता कुटे , लीलाबाई बनकर , भिमराज कांबळे , नंदा कराळे , ग्रामसेवक भाग्यश्री देवतले व ग्रामस्थ कोल्हेवाडी याबरोबख आगणवाडीताई , आशासेविका , गावातील शिक्षकवर्ग , शालेय शिक्षण समितिचे अध्यक्ष तात्याभाऊ बनकर  व तरुण मित्र परिवाराने परिश्रम घेतले.
—————————————————-
वर्षाभरापासून कोल्हेवाडीला आदर्श गाव बनविण्यासाठी ग्रामस्थांच्या सहकार्याने झपाट्याने कामे केली . त्याचे फळ आम्हाला मिळाले .  गावकऱ्यांच्या एकीमुळे व आमच्यावर टाकलेल्या विश्वासामुळे हे शक्य झाले . मिळालेले पुरस्कार ग्रामपंचायतच्या कामाचे प्रतीक नसुन जनतेच्या एकीचे फळ आहे.
( मनिषा रविंद्र कुटे , सरपंच कोल्हेवाडी )
—————————————————-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here