फिल्मी स्टाईलने मुलीची आई-वडिलांच्या समोरच प्रियकराच्या दुचाकीवर बसून धूम

0
210
जामखेड न्युज – – – – – 
आई वडिलांनी आयुष्यभर झटून ज्या मुला-बाळांचे पालन पोषण केले, त्याच मुलांची आई वडिलांना वाऱ्यावर सोडण्यापर्यंत मजल गेल्याची अनेक उदाहरणं समोर येत असतात. असाच काहीसा प्रकार वर्धा जिल्ह्यातील तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पारडी फाट्याजवळ घडला. प्रियकराच्या घरुन ताब्यात घेतल्यानंतर प्रेयसीने पुन्हा आई-वडिलांच्या समोरच प्रियकराच्या दुचाकीवर बसून धूम ठोकल्याची घटना घडली आहे.
             ADVERTISEMENT                         
लघुशंका करण्याच्या बहाण्याने मुलगी कारमधून खाली उतरली. त्याच वेळी प्रियकर फिल्मी स्टाईलने तिथे बाईक घेऊन आला. त्यानंतर मुलीने त्याच्या बाईकवर बसून आई-वडिलांच्या डोळ्यांदेखतच पळ काढला. कुटुंबीयांनी याबाबतची तक्रार तळेगाव पोलिसात दाखल केली आहे. मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी प्रियकराविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे प्रकरण
१७ वर्षीय मुलीचे अक्षय नामक मुलाशी प्रेम जुळले, मात्र मुलगी अल्पवयीन असल्याने घरच्यांनी त्यांच्या या नात्याला विरोध केला. मात्र, कुटुंबीयांच्या विरोधाला झुगारुन मुलीने घरातून पळ काढला आणि थेट प्रियकरासोबत राहू लागली. याची माहिती मिळाली असता मुलीच्या घरच्यांनी मुलाच्या घरी जाऊन तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अजून तुझे वय लहान आहे, वयात आल्यावर लग्न करा, असे समजावून मुलीला देववाडी येथून मुलाच्या घरातून ताब्यात घेतले.
लघुशंकेच्या बहाण्याने कारखाली उतरली
घरी घेऊन जात असताना मुलीने पारडी फाट्याजवळ लघुशंकेचा बहाणा करुन कार थांबवायला सांगितली. चालकाने कार थांबवली असता मुलगी खाली उतरली. काही वेळातच पारडी फाट्यावर मुलीचा प्रियकर अक्षय दुचाकीवर आला. मुलीने घरच्यांसमोरच मुलाच्या दुचाकीवर बसून धूम ठोकली.
घटनेनंतर मुलीला पळवून नेल्याची तक्रार तळेगाव पोलिसात देण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून त्याचा पोलीस शोध घेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here