जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
आमदार रोहित पवारांच्या माध्यमातून कर्जत-जामखेड याच बरोबर तीर्थक्षेत्र असलेल्या चौंडीत मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. या कामामुळे जनता समाधानी आहे पण हा विकास भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांना दिसत नाही तेव्हा भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून घ्यावी म्हणजे आमदार रोहित पवारांचा विकास दिसेल तसेच समोरासमोर चर्चा करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे काकासाहेब कोल्हे यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांना दिले आहे.
भाजपा पदाधिकाऱ्यांनी आरोप करण्यापेक्षा सामोरा समोर विकासाच्या बाबतीत चर्चा करू मग कळेल विकास काम झाले की नाही असेही कोल्हे यांनी सांगितले
यावेळी पत्रकारांशी बोलताना काका कोल्हे यांनी सांगितले की, माजी मंत्री प्रा. राम शिंदे 12,13 खात्याचे मंत्री राहून सुद्धा ज्यांना स्वतःच्या, गावची ग्रामपंचायत, सोसायटी ताब्यात ठेवता आली नाही अशा बगलबच्यानि आमच्या नेत्यावर टीका करून स्वतःची उंची दाखवून देऊ नये.
आपले साहेब मंत्री असताना जे काम झालं आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे तरी पण आपण साहेबांचं गुण गाता याचा गावचा नागरिक म्हणून टीका करताना आपल्याला शरम वाटली पाहिजे.
अडिच वर्षांत आमदार रोहित पवार यांनी मंजूर केलेली कामे
1)25 – 15 17 लाख पूर्ण 2 रस्ते सिमेंट
2)समाजकल्याण 59 लाख
3)पाणंद रस्ते 16 लाख
4)तलाठी कार्यलय 34 लाख
5) चोंडी हद्द ते आघी रस्ता
6)4कोटी 13 लाख घाट
7) 34 लाख खडीकरणं
8) चोंडी ते चापडगाव रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण
9)चोंडी ते हळगाव रस्तारुंदीकरण व डांबरीकरण
सध्या सुरू असलेली मंदिराची डागडुजी तसेच 5 कोटी रुपये शाळेसाठी मंजूर केले.
कार्यसम्राट आमदार मा श्री रोहित (दादा) पवार हे येणाऱ्या काळात चौंडी हे गाव महाराष्ट्र राज्यात एक नंबर च पर्यटन स्थळ केल्याशीवाय राहणार नाही त हे पाहण्याची दृष्टी देवाने आपल्याला द्यावी.
चौकट
दादांनी जे विकास कामे केली आहेत ते पाहण्यासाठी अगोदर आपण आपल्या गावात राहायला पाहिजे व आपण भाजपचा चष्मा काढून ठेवला पाहिजे तरच आपल्याला अडीच वर्षात केलेली विकास कामे दिसतील.
काकासाहेब कोल्हे तालुका अध्यक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,सोशल मिडिया प्रमुख जामखेड तालुका