जामखेड न्युज – – – –
युती सरकारच्या काळात भाजपा आमदारांनी मंजूरी आणलेल्या कामांच्या उद्घाटनाचे नारळ महाविकास आघाडीचे आमदार करतात असा आरोप खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला
खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी तीन वर्षांच्या काळातील कामाचा लेखाजोखा पत्रकार परिषदेत सांगितला यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरूण मुंढे, माजी महापौर बाबासाहेब वाळके, मनोज कोकाटे, भैय्या गंधे
किशोर डागवाले यांच्या सह काही पदाधिकारी व जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की तो लोकप्रतिनिधी टक्केवारी मागितल्या मुळे ठेकेदाराला काम करणे मुश्किल झाल्यामुळे त्याने काम थांबवण्याचा निर्णय घेतला आहे अशा टक्केवारी मागणाऱ्या लोकप्रतिनिधी मुळे जिल्ह्याच्या विकास थांबवण्याचे काम होत असल्याची टीका खा. सुजय विखे यांनी केलीय.
भाजपाच्या आमदारांच्या काळातील मंजूर कामे विरोधी आमदार नारळ फोडून श्रेय घेतात हे दुर्दैव आहे.
केंद्र सरकारच्या माध्यमातून तीन वर्षांच्या काळात 14 हजार कोटी रुपयांची महत्त्वपूर्ण कामांसाठी निधी आणला. तसेच तीन वर्षाच्या कामाबद्दल मी समाधानी आहे असेही खासदार डॉ सुजय विखे-पाटील यांनी सांगितले. तसेच अनेक महत्वपूर्ण प्रकल्प नियोजित वेळेच्या आधी संपविले माळढोक अभयारण्य प्रकल्प युको सेन्सेटिव्ह झोन दहा किलोमीटर वरून चारशे मीटरवर आणला यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचा फायदा झाला. तसेच जिल्ह्य़ातील रस्ते मार्गी लागले नगर उड्डाण पुलाचे काम ऐंशी टक्के पुर्ण झाले आहे.
पुढील दोन वर्षांत नगर शहरात ट्राॅफिक समस्या राहणार नाही तसेच शहरातील घराघरात पिण्याचे पाणी मिळेल