जामखेड न्युज – – – –
अहमदनगर जिल्ह्यात लोकपरतींधिनी टक्केवारीची सवय लावली असल्याने रस्त्यांची कामे दर्जेदार होत नाहीत मात्र हा प्रकार थांबायला तयार नाही नगर मनमाड रोडचे चौपदरी करणाचे काम ज्या ठेकेदाराने घेतले होते त्या ठेकेदाराला काही लोकप्रतिनिधींना टक्केवारी मागितली त्यामुळे तो ठेकेदार काम सोडून जात असून त्याने तसे पत्र दिले असल्याची धक्कादायक माहिती खा. सुजय विखे यांनी नगर मध्ये एका पत्रकार परिषदेत बोलताना दिलीय.
खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी तीन वर्षांच्या काळातील कामाचा लेखाजोखा पत्रकार परिषदेत सांगितला यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरूण मुंढे, माजी महापौर बाळासाहेब वाळके, मनोज कोकाटे, भैय्या गंधे यांच्या सह काही पदाधिकारी व जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की तो लोकप्रतिनिधी कीं आहे मंत्री आहे। का नाही ते मी सांगणार नाही मात्र टक्केवारी मागितल्या मुळे ठेकेदाराला काम करणे मुश्किल झाल्यामुळे त्याने काम थांबवण्याचा निर्णय घेतला आहे अशा टक्केवारी मागणाऱ्या लोकप्रतिनिधी मुळे जिल्ह्याच्या विकास थांबवण्याचे काम होत असल्याची टीका खा. सुजय विखे यांनी केलीय.
भाजपाच्या आमदारांच्या काळातील मंजूर कामे विरोधी आमदार नारळ फोडून श्रेय घेतात हे दुर्दैव आहे.
केंद्र सरकारच्या माध्यमातून तीन वर्षांच्या काळात 14 हजार कोटी रुपयांची महत्त्वपूर्ण कामांसाठी निधी आणला आरोग्याच्या बाबतीत मोठे काम केले आहे.
पुढील दोन वर्षांत नगर शहरात ट्राॅफिक समस्या राहणार नाही तसेच शहरातील घराघरात पिण्याचे पाणी मिळेल