जामखेड न्युज – – – –
अहमदनगर-औरंगाबाद रोडवरील खोसपुरी (ता. नगर) शिवारात हॉटेल लोकसेवा येथे आज पहाटे एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली.या ठिकाणाहून तीन पीडित महिलांची सुटका करून चार जणांना अटक केली आहे. एक जण पसार झाला आहे. या प्रकरणी पाच जणांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक गणेश कावरे यांनी फिर्याद दिली आहे.
जुबेर जमालभाई शेख (वय 42), भैय्या ऊर्फ सरफराज जमालभाई शेख (दोघे रा. खोसपुरी), सतिष दशरथ होंडे (वय 35), संदीप राजेंद्र वांढेकर (वय 36) व सोमनाथ छगन घागरे (वय 28, तिघे रा. राघुहिवरे ता. पाथर्डी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
जुबरे जमालभाई शेख व भैय्या ऊर्फ सरफराज जमालभाई शेख हे दोघे भाऊ त्यांच्या खोसपुरी येथील लोकसेवा हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय चालवित होते. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली होती.
तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक युवराज आठरे यांच्या पथकाने पहाटे छापा टाकला. यावेळी तीन पीडित महिलांची पोलिसांनी सुटका केली.
याठिकाणी हॉटेल मालक जुबेर शेखसह तीन ग्राहक मिळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत अटक केली आहे. भैय्या ऊर्फ सरफराज शेख पसार झाला आहे. अटक केलेल्या आरोपींकडून 11 हजार रूपये जप्त करण्यात आले आहेत.