जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
स्वच्छ सर्वेक्षण २०२१ स्पर्धेत जामखेड शहराचा पहिल्या पाचमध्ये क्रमांक आणण्यासाठी आमदार रोहित पवार व त्यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार हे स्वतः हातात झाडू व खोरे घेऊन स्वच्छता करताना दिसतात स्वच्छता हि लोकचळवळ होऊन स्वच्छ जामखेड सुंदर जामखेड व्हावे म्हणून सामाजिक कार्यकर्ते रमेश (दादा) आजबे यांनी प्रभाग वीस मधील लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले व सकाळी आठ वाजता प्रभागातील नागरिक लहान मुले, महिला व पुरुष एकत्र येत श्रमदान करत परिसर चकाचक केला स्वतः रमेश आजबे यांनी स्वच्छता करत स्वच्छता हि लोकचळवळ केली आहे.
देशांमध्ये स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा होत असून विविध गटांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत जामखेड शहराला पहिल्या पाच क्रमांकात स्थान मिळवून देण्यासाठी व जामखेडची वेगळी ओळख निर्माण होण्यासाठी आमदार .रोहित पवारांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. स्वच्छता हि लोकचळवळ व्हावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते रमेश ( दादा) आजबे यांनी प्रभाग वीस मधील नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले व सकाळी आठ वाजता प्रभागात लहान मुलांसह महिला व पुरुषांनी एकत्र येऊन श्रमदान करत परिसर स्वच्छ केला

स्वच्छता ही लोकचळवळ व्हावी यासाठी आमदार रोहित पवार यांनी मोठ्या प्रमाणावर काम सुरू केले आहे स्वतः हातात फावडे घेत तर कधी झाडू घेत अनेक वेळा आमदार रोहित पवार हेही श्रमदान करताना दिसतात.
आज सकाळी आठ वाजता प्रभाग वीस मधील महिला, पुरुष, लहान बालके एकत्र येत डॉ. शोभा आरोळे यांच्या घरापासून ते कोल्हे वस्ती पर्यंतचा परिसर स्वच्छ करत चकाचक केला यावेळी स्वतः सामाजिक कार्यकर्ते रमेश ( दादा) आजबे यांनी हातात झाडू घेत स्वच्छता केली यामुळे नागरिकांनीही अंग झटकून स्वच्छता केली. प्रभाग वीस मध्ये रमेश आजबे यांनी स्वच्छता हि लोकचळवळ केली आहे. इतर प्रभागातील नेते व नागरिकांनी हा आदर्श घेऊन आपला प्रभाग स्वच्छ व सुंदर केला तर स्वच्छ जामखेड सुंदर जामखेड होईल व जामखेड चा क्रमांक स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये पहिल्या पाच शहरात असेल व आमदार रोहित पवार व त्यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांचे स्वप्न सत्यात उतरेल.

चौकट
प्रभाग वीस मध्ये सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले व नागरिकांना श्रमदानासाठी येण्याचे आवाहन केले होते सकाळी आठ वाजता मोठ्या संख्येने नागरिक श्रमदानासाठी हजर होते. यात एक वर्षाची चिमुकलीही हातात झाडू घेऊन रस्ता झाडण्याचा प्रयत्न करत होती. या वयात स्वच्छतेची सवय लागली तर पुढील अनेक दिवस भारतात जामखेड स्वच्छतेच्या बाबतीत अग्रेसर राहील.