तृतीय रत्न नाट्यप्रयोगाचे आज नगरमध्ये मोफत आयोजन

0
195
जामखेड न्युज – – – – – 
अहमदनगर येथील शिर्डी रोड वरील  माऊली संकुलातील  माऊली नाटयगृहात मंगळवार दिनांक 24 मे 2022 रोजी सायंकाळी 6:00 वाजता होणारा नाट्यप्रयोग सर्व रसिकांच्यासाठी  , छत्रपती शिवाजी महाराज , शाहू महाराज, महात्मा फुले ,डाॅ बाबासाहेबआंबेडकर, अण्णा भाऊ साठे यांच्या विचाराचे पाईक या सर्वांसाठी   नि:शुल्क / मोफत प्रवेश ठेवण्यात आला आहे . महात्मा जोतिराव फुले यांच्या शैक्षणिक ध्येयांनी प्रेरित सामाजिक विचारांचा  प्रसार व्हावा , त्यांच्या समाज प्रबोधनासाठीच्या प्रयत्नांचे मोल कळावे या उद्देशाने मंत्री इतर मागास बहूजन कल्याण विभाग तथा माज्योतीचे अध्यक्ष  विजय वडेट्टीवार , संचालक डाॅ बबनराव  तायडे ,प्रा दिवाकर गमे , लक्ष्मण वडले यांनी महाज्योतिच्या वतीने राज्यातील विविध जिल्ह्यात  महात्मा जोतिराव फुले लिखित ‘ तृतीय रत्न’ नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन केले आहे  प्रा. अनिरुद्ध वनकर यानी नाटकाचे दिग्दर्शन केले आहे त्यांच्यासह  इतर 30 कलाकाराचा नाटकात सहभाग  असणार आहे .
हे प्रेरणादायी नाटक पहाण्यासाठी  अहमदनगर शहर व जिल्ह्यातील सर्व बंधू भगिनींनी उपस्थित राहण्याचे आवाहन  नाटकाचे दिग्दर्शक प्रा. अनिरुद्ध वनकर महाज्योतिचे व्यवस्थापकीय संचालक प्रदिपकुमार डांगे व जामखेड़ चे बौद्धाचार्य गोकुळ गायकवाड यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here