जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
नगर जामखेड बीड या राष्ट्रीय महामार्गावर आसलेल्या जामखेड ते चिंचपूर या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे. या महामार्गावरील रस्ता उखडून मोठ मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याची चाळणी झाली आहे. परीणामी वाहन चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्याची तत्काळ दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे. हा महामार्ग म्हणजे असून अडचण नसून खोळंबा झाला आहे. जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत आहेत. श्रेयासाठी खासदार व आमदार यांची रस्सीखेच सुरू आहे मात्र खड्याकडे दुर्लक्ष होत आहे अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.
मागील दीड महिन्यापुर्वी याच रस्त्यावरील जामखेड शहराच्या जवळ विंचरणा नदीच्या पुलावरील काही ठिकाणी तर बीड रोडवरील साकत फाट्याच्या आलीकडे काही ठिकाणी रस्त्यावर डांबर टाकुन तात्पुरती मलमपट्टी केली आहे. त्यामुळे अनेकांना आसे वाटत होते की आता या रस्त्याची संपूर्ण दुरुस्ती करून डांबरीकरण होईल मात्र ही आशा फोल ठरली आर्धवट मलमपट्टी करुन आनेक ठिकाणी रस्त्याची दुरवस्था आहे.
जामखेड ते बीड जिल्ह्य़ातील चिंचपूर या राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी जीवघेणे खड्डे पडल्याने या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्याच बरोबर जामखेड शहरातून जाणाऱ्या या जामखेड बस स्थानक ते खर्डा चौक या ठिकाणी देखील मोठमोठे खड्डे पडले आहेत. राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतरही सदर रस्त्याच्या दुरूस्तीकडेही सबंधीत विभागाचे दुर्लक्ष होत आहे. गेल्या एक वर्षापासून याबाबत वारंवार मागणी करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.परिणामी सध्या वाहनचालकांना जीव मुठीत धरूण प्रवास करावा लागत आहे.
जामखेड तै सौताडा या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे कामास मंजुरी मिळाली आहे. मात्र अद्याप या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाले नाही. त्यामुळे देखील शहरातील या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ट्रॉफीक जाम होते त्यामुळे तातडीने हे काम देखील सुरू करण्याची मागणी जामखेड करांकडुन होत आहे. मंजूर झालेल्या जामखेड ते सौताडा या १८० कोटींच्या या रस्त्याचे रुंदीकरण झाले तर वहातुक अडथळा दुर होऊन ट्रॉफीक पोलीसांचे देखील काम हालके होण्यास मदत मिळणार आहे. तसेच जामखेड शहराच्या वैभवात देखील भर पडणार आहे.
चौकट
या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष नाही. तो रस्ता केंद्राकडे आहे त्यामुळे आम्ही काही करू शकत नाहीत असे अधिकारी सांगतात. आता उद्घाटन होऊनही बरेच दिवस झाले तरीही रस्ता अद्यापही सुरू होत नाही खासदार डॉ सुजय विखे-पाटील व आमदार रोहित पवार दोघांनीही पत्रकार परिषदेत सांगितले की, आम्ही गडकरी साहेबांना भेटून निधी आणला आहे. जनतेचे म्हणणे एवढेच आहे की कोणीही आणू द्या पण काम लवकर सुरू करावे जेणेकरुन वाहनचालकांना त्रास होणार नाही. प्रवास सुखकर होईल. श्रेयासाठी रस्सीखेच आहे पण खड्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे.