जामखेड प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त जामखेड शहरात “आमदार चषक” ( जामखेड प्रीमियर लीग ) भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेचा शुभारंभ शुक्रवार दि. 19 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 10.00 वाजता होणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार रोहित ( दादा ) पवार यांच्या हस्ते होत आहे. अशी माहिती स्पर्धेचे आयोजक सावळेश्वर उद्योग समूहाचे नेते सामाजिक कार्यकर्ते रमेश ( दादा ) आजबे यांनी दिली.
सामाजिक कार्यकर्ते रमेश (दादा) आजबे यांनी ही स्पर्धा आयोजित केली आहे या स्पर्धेचे ठिकाण आरोळे हॉस्पिटल मागे करमाळा रोड येथे आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांकाच्या संघास एक लाख रुपये, द्वितीय क्रमांकास पंच्याहत्तर हजार रुपये, तृतीय क्रमांकास, एक्कावन्न हजार रुपये तर चौथ्या क्रमांकाच्या संघास एकतीस हजार रुपये आहे. मॅन ऑफ द सिरीज एक सायकल आहे. मॅन ऑफ दि मॅच फायनल दोन हजार एक रूपये, उत्कृष्ट गोलंदाज दोन हजार एक रूपये, उत्कृष्ट फलंदाज दोन हजार एक रूपये, उत्कृष्ट संघास पाच हजार एक रूपये बक्षिस ठेवण्यात आले आहे. प्रत्येक संघास प्रवेश फी पाच हजार रुपये राहिल.
स्पर्धेत भाग घेण्यासाठी संपर्क जब्बार शेख फोन नंबर 9272583755, सूर्यकांत बोराडे – 9112762993, संतोष गव्हाळे 7774873999, मनोज डाडर – 9881058008, अस्लम आतार – 9823811019, गफ्फार शेख – 8698439810, अजय कोल्हे – 8623828071 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजक रमेश ( दादा) आजबे यांनी केले आहे.
स्पर्धेचे नियम व अटी पुढीलप्रमाणे आहेत. १) सामना वेळेवर सुरू होईल. २) पहिल्या बत्तीस संघांना प्राधान्याने प्रवेश दिला जाईल. ३) स्पर्धेत ग्रामीण भागातून सोळा संघ व शहरी भागातून सोळा संघ प्रवेशासाठी पात्र राहतील शहरी व ग्रामीण दोन गट असतील. ४) पंचाचा निर्णय अंतिम राहिल याची सर्व संघांनी नोंद घ्यावी असे सांगण्यात आले आहे.