जामखेड न्युज – – – –
कडा येथील मेहकरी फाटारोड लगत असलेल्या जलतरण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या जामखेड येथिल १४ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. यामुळे जामखेड परिसरात शोककळा पसरली आहे. दोन दिवसांपूर्वी पाटोदा येथे एका मुलाचा जलतरण तलावात मृत्यू झाला होता दोनच दिवसात परत कडा येथे दुसरा मृत्यू झाला आहे. यामुळे जलतरण तलावाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, आठवड्यातील अशी दुसरी घटना आहे. या अगोदर पाटोदा शहरातही मुलाचा बुडून
मृत्यू झाला होता. त्यामुळे जलतरण तलावातील सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. आयान फयाज शेख असे मृत
मुलाचे नाव आहे. कडा येथील द्वारका प्रतिष्ठानचे इंटरनॅशनल गुरुकुल असून त्यांचाच बीड-नगर महामार्गा पासून जवळच मेहकरी फाटा रोडवर जलतरण तलाव आहे. उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी
पोहण्यासाठी गर्दी असते. सकाळी जामखेड येथील आयान
हा नातेवाईकांसह अहमदनगर येथे दवाखान्यात गेला होता.
अहमदनगरवरून जामखेडकडे येताना तो पोहण्यासाठी थांबला. यातच त्याचा बुडून मृत्यू झाला.